पिंपरी - पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शहरातील केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन गृहप्रकल्पांना काही काळ परवानगी देऊ नये, असा अजब निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला त्याचा आर्थिक फटका बसणार असून, स्थानिक आमदारांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू असताना रीतसर परवानगी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अडचणीत आणणाºया निर्णयाविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शहरातील प्रगतिशील भाग म्हणून पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे परिसर ओळखला जातो. या ठिकाणी रीतसर परवानगी घेण्यास अटकाव करण्याच्या निर्णयाने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच शहरातील पिंपरी व भोसरी मतदारसंघात ही बंदी नसल्याने महापालिका प्रशासन चिंचवड मतदार संघापुरते अंमलबजावणी करणार का, या विषयी उत्सुकता आहे.गेल्या आर्थिक वर्षात १ हजार ७०० हून अधिक बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली. त्यातून बांधकाम परवाना विभागाला ३९९ कोटींचा महसूल मिळाला. राज्य सरकारने ह्यरेराह्ण (रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट) हा नवीन कायदा १ मेपासून लागू केला. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून अधिकाधिक महसूल महापालिकेला मिळाला आहे. परंतु, नवीन निर्णयाने उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.धोरणाशी विसंगत निर्णय१केंद्र व राज्य शासनाने हक्काचे घर देण्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी अनधिकृत बांधकामांऐवजी अधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, महापालिका स्थायी समितीने शासनाशी विसंगत निर्णय घेतला आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे आदी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्याठिकाणी गृहप्रकल्प व सदनिकांना मागणी वाढत आहे.गृहप्रकल्पांचा सुविधांवर ताण२ चिंचवड मतदारसंघातील वाढत्या गृहप्रकल्पांमुळे नागरी समस्यांमध्ये भर पडत आहे. विशेषत: पाणीटंचाईच्या काळात मूलभूत सुविधांवर ताण येत असल्याचा दावा भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचा दावा स्थायी समितीतील भाजपाच्या सदस्यांनी केला आहे. या ठरावावर सूचक म्हणून विलास मडिगेरी यांची, तर अनुमोदक म्हणून सागर आंगोळकर यांची स्वाक्षरी आहे. विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘पावसाळा सुरू झाला असला, तरी पावसाचे प्रमाण व धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.’’
अधिकृत बांधकामांना नो एन्ट्री, ‘स्थायी’चा चिंचवड मतदारसंघासाठी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:10 AM