शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 1:25 AM

गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.

कामशेत  - गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. ऐन दिवाळीत बहुतेक एटीएम बंद असल्याने खातेदारांना बँकेच्या लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यातही अनेक बँकांचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. सलग सुटीमुळे बँका बंद राहणार असल्याने अनेक जण पैसे काढण्यासाठी एटीएमकडे धाव घेत आहेत. मात्र, येथील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट झाल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. सर्वच बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारांची लगबग होती. बँका खातेदारांनी फुलून गेल्या होत्या. बँकांच्या बाहेरपर्यंत रांग लागली होती.अनेक जण एटीएममध्ये जाऊन नाइलाजाने परत रांगेत उभे राहत होते. बहुतेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने कामकाज ठप्प होते. वैतागलेले बँक कर्मचारी व चिडलेले खातेदार यांचे अनेकदा खटके उडू लागले. बँकेत साधारण दोन-एक तास थांबूनही पैसे मिळाले नसल्याने अनेक खातेदारांना सणासुदीची खरेदी करता आली नाही. बहुतेकांना तळेगाव, लोणावळा येथील एटीएम केंद्रांचा आधार घ्यावा लागला.कामशेत शहरात विविध बँकांची नऊ एटीएम केंद्रे असून गेल्या काही दिवसांपासून ही केंद्रे बंद आहेत. नेहमी २४ तास सेवा देणारी हि एटीएम बंद असल्याने तसेच मावळ सोडून प्रमुख शहरांमध्ये एटीएम सुविधा विना खंडित अहोरात्र सुरु असते पण मावळात ही सुविधा सुरळीत नसते.ऐन दिवाळीत एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट असल्याने खातेदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.त्यात महत्त्वाच्या बँकांची एटीएम मशीन कायमच बंद असल्याने या बँकेचे खातेदार मेटाकुटीला आले आहेत. शहरातील बहुतेक एटीएम केंद्रांबाहेर पैसे शिल्लक नसल्याचा बोर्ड नेहमीच टांगलेला असतो. कायमच सर्वच एटीएम सुविधा बंद असतात. खातेदारांना या एटीएममधून दुसऱ्या एटीएम केंद्रामध्ये चकरा मारण्यावरून वाचून पर्याय उरत नाही. पण सर्वच एटीएम केंद्रांवर असाच गलथान कारभार आहे. त्यामुळे खातेदार बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जातात. मात्र बँकांचा सर्व्हर बंद असल्याचे उत्तर मिळत असल्याने लांबच लांब रांगेत उभे राहूनशेवटी रिकाम्या हाती माघारी फिरण्याची वेळ खातेदारांवर येते. यातूनच बँक अधिकारी कर्मचारी व खातेदार यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होतात.कामशेत हे मावळातील प्रमुख शहरांपैकी एक असून, नाणे-आंदर-पवन मावळासह आजूबाजूच्या सुमारे ७० गावांमधील ग्रामस्थ खरेदी वा तत्सम कारणांसाठी शहरात येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये कामशेत शहरातील बाजारपेठ व या बाजारपेठेत होणाºया मोठमोठ्या उलाढाली लक्षात घेऊन येथे अनेक बँकांनी आपले बस्तान बसवले आहे. कामशेत व आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थांनी सरकारी बँकांच्या ढिसाळ कारभाराला वैतागून या बँकांमध्ये खाती उघडली. मात्र त्यांचेही व्यवहार व खातेदारांना पुरवण्यात येणाºया सुविधा सरकारी बँकेसारख्या होऊ लागल्याने ग्रामीण भागाला कमी का लेखले जाते, असे बोलले जात आहे.

टॅग्स :atmएटीएमpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड