पिंपरी : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, तूर्तास पाणीकपात करणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. एक एप्रिल २०१७ पासून सुमारे पन्नास हजार नवीन कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले असून, तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या वाढली असल्याचे सांगत़ मानांकनानुसार दरडोई प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी २८ हजार ७०९ नळ कनेक्शनला दिले जाते. तर, ४२ हजार ४०९ नळ कनेक्शनला १३५ लिटर पाणी मिळते. दहा टक्के कमी जास्त होते. तर, ५८ हजार १२५ नळ कनेक्शनला दीडशे लिटरपेक्षा जास्त पाणी मिळते. शहरात अनधिकृत नळजोड कनेक्शनचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले जाते. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दूषित पाणीपुरवठादेखील होतो. त्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनचे सर्वेक्षण सुरू केले आहे.सांडपाण्याचा पुनर्वापरहर्डीकर म्हणाले, ‘‘सोसायट्यांनी सांडपाण्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी)बंद आहेत. त्यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करावेत. त्यानंतर बीट निरीक्षक प्रकल्प चालू आहे की नाही, याची पाहणी करून कारवाई करणार आहेत. सांडपाण्याचा उद्यान, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. कामात दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल. तसेच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम वेगात सुरू आहे.’’>प्रयत्न : तिसऱ्या मजल्यावर पाणी देणे शक्यहर्डीकर म्हणाले, ‘‘अनेक सोसाट्यांमध्ये उंचावर पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सोसाट्यांमध्ये भूमिगत जलकुंभाची व्यवस्था नाही. त्यामुळे दुसºया, तिसºया मजल्यावर पाणी पोहोचत नाही. आजमितीला महापालिका केवळ एक मीटर उंचावर पाणी देऊ शकते. तिसºया मजल्यावर पाणी देणे शक्य होणार नाही. गळती रोखल्यास उंचीवर पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
उद्योगनगरीत नाही पाणीकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:24 AM