शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

By admin | Published: July 05, 2017 2:59 AM

आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा प्रकारची केवळ आश्वासने दिले आहेत हेच राजकीय नेते आज चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करीत आहेत़ त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपण सर्वांनी एकत्रित राहून हा लढा तीव्र केला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास पाहता जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रिंगरोड बाधित नागरिकांच्या घर बचाव संघर्ष समितीने काळेवाडी फाटा येथील बीआरटी मार्गावर आयोजित सभेत केले.ते पुढे म्हणाले की, झोडा आणि फोडा ही नीती हाणून पाडायची असेल तर संघटन मजबूत ठेवून या भुलभुलैय्याला उत्तर केवळ संघर्षातून देता येईल. या वेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शस्ती कर आणि प्रस्तावित रिंगरोडमधून बाधित होणाऱ्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी हा लढा कायमचा प्रश्न सुटेपर्यंत असाच चालू राहणार आहे, असा निर्धार या वेळी करण्यात आला.वाल्हेकरवाडीसह थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागांतून प्रस्तावित असणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी तसेच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध असणारांची संयुक्त सभा काळेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आली होती.या वेळी हजारो महिला उपस्थित होत्या. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोध ठाम विरोध केला आहे. प्राधिकरण आणि पिंपरी पालिकेच्या चुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास कशासाठी? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. ‘महिला शक्ती उतरी है, नयी रोशनी लायी है,’ हम सब एक है, फुल नाही चिंगारी है, घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, सर उठाके हल्लाबोल, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी मानव कांबळे, मारुती भापकर, हिरामण बारणे, कॉम्रेड विलास सोनवणे, राहुल कलाटे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, विजय पाटील, धनंजय येळेकर, ज्योती टिळेकर, रेखा भोळे, नंदा काकडे आदींसह परिसरातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते.अनधिकृत घरे अधिकृत होण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता़ तेच आमदार आणि खासदार अनधिकृत बांधकामाचा विषय समोर घेऊन पुन्हा आपल्या मतावर निवडून आले. ते आज गप्प का? त्यांना या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. रिंगरोडबाबत हे आता वेगळी भूमिका का घेत आहेत? आता आमदार म्हणतात, रिंगरोड बाधित कुटुंबाना पंतप्रधान आवास योजनेतून पाच ते सहा लाखांत घरे उपलब्ध करून दिले जातील. या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला योजनेची घरे नको आहेत तर आमची हक्काची घरे वाचली पाहिजे. जर इतर आरक्षणे बदलता येतात तर हे आरक्षणसुद्धा शासनास बदलण्यास आपण भाग पाडू़- मानव कांबळे