पिंपरी : संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या प्रभागांमध्येही मतदान केंद्राबाहेर उमेदवारांसंबंधी माहितीचे फलक लावले होते. त्या फलकावर निवडणूक रिंगणातील उमेवारांवर गुन्हे नाहीत, असा उल्लेख दिसून आला. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी निरंक दाखवली असताना, महापालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवसापर्यंत ठिकठिकाणी राडेबाजी कशी झाली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराची संपत्ती, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची उमेदवाराने प्रतिज्ञापत्रावर सादर केलेली माहिती जनतेला व्हावी, यासाठी या वेळी पहिल्यांदाचमतदान केंद्राबाहेर मोठे फलक लावले होते. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी नजरेस पडेल अशा पद्धतीने हे फलक लावले होते. (प्रतिनिधी)
गुन्हे नसलेले उमेदवार; तरीही ठिकठिकाणी राडा
By admin | Published: February 23, 2017 2:57 AM