पिंपरी : काँग्रेसचा गड म्हणून लौकिक असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष राष्टÑवादीने केला. महापालिका क्षेत्रात गेल्या निवडणुकीत १४ नगरसेवक निवडून आले होते. विद्यमान नगरसेवकांपैकी ९५ टक्के जण दुसºया पक्षांत गेल्याने महापालिकेच्या आखाड्यात एकही विद्यमान नगरसेवक रिंगणात नाही. काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांपुढे आता अस्तित्वाची लढाई असणार आहे.
महापालिकेत गेली अनेक वर्षे काँग्रेसचे प्राबल्य होते. दिवंगत माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कालखंडात सत्तेत काँग्रेसला समान वाटा होता. त्यामुळे काँग्रेसचा गड म्हणून या महापालिकेस महत्त्व होते. सरांच्या निधनानंतर मात्र काँग्रेस फुटण्यास सुरुवात झाली. समान वाटेकरी असणारा पक्ष कमी होऊ लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रा. मोरेसरांनंतर राज्य आणि देशातील कोणत्याही नेत्याने गांभीर्याने लक्ष दिले नाही. सत्ता असताना कार्यकर्त्यांना साधी प्राधिकरण समिती किंवा विशेष दंडाधिकारी पदही मिळाले नाही. त्यामुळे एकामागून एक गट काँग्रेसमधून बाहेर पडला. त्यानंतर १४ नगरसेवकांवर संख्या आली. यंदा महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे.