चिंचवड : सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.चिंचवडमधील दळवीनगरमध्ये स्वस्त धान्याच्या दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी उसळली आहे.भांडणाच्या घटना घडत नागरिकांनी रांगेत पिशव्या ठेऊन नंबर लावले आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार हतबल झाले आहेत.घराची चूल पेटविण्यासाठी काहींचा धावा सुरू आहे.मात्र घरातील धान्य संपल्याने अनेकजण अडचणीत आहेत.शासनाकडून देण्यात येणारे अन्न-धान्य वितरित करणारी यंत्रणा सज्ज झाली आहे.मात्र अशा दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी वाढत आहे.संचारबंदी चे उल्लंणघन करीत,तोंडावर मास्क न लावता अनेक जण घराबाहेर पडत आहेत.दळवीनगरातील स्वस्त धान्य दुकाना बाहेर गर्दी वाढत असून नागरिकांमध्ये भांडणे होण्याचे प्रकार वाढले आहेत.
हा कचरा नव्हे....स्वस्त धान्य दुकानाबाहेर पिशव्यांच्या रांगा; नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:17 IST
उन्हाच्या झळा वाढत गेल्यावर नागरिक रांगेत पिशव्या ठेऊन आपला नंबर येईल याची प्रतीक्षा करत एकत्रित बसत आहेत.
हा कचरा नव्हे....स्वस्त धान्य दुकानाबाहेर पिशव्यांच्या रांगा; नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली
ठळक मुद्देदुकान बंद झाल्यावर पुन्हा उघडेपर्यंत नागरिक रस्त्यावर बसून रहात असल्याने परिसर संतप्त