पवनानगर : मावळ व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावर उत्खनन व झाडांची कत्तल केली जात आहे. निसर्गरम्य पवन मावळात मुंबई व पुण्यासह राज्याबाहेरील उद्योजक, सिनेअभिनेते वराजकीय मंडळींनी या परिसरातील नैसर्गिक प्रवाह व टेकडीवरअनधिकृत बांधकाम करून ‘सेकंड होम’साठी बंगले उभारले आहेत. त्यामुळे मावळातील जैवविविधतेला धोका पोहचला आहे. त्यामुळेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संबंधित ६४ जणांना अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा बजाविल्या आहेत.‘लोकमत’ने ‘पवना उगम ते संगम’ अशी ‘आॅन द स्पॉट’ वृत्तमालिका प्रसिद्ध केली. यामध्ये पवनेच्या उगमापासून अतिक्रमण सुरू झाल्याचे वास्तव मांडले. तसेच, नैसर्गिक डोंगर-टेकड्यावर बेकायदा उत्खन्न करून अनधिकृतपणे ‘सेंकड होम व फार्म हाऊस’साठी बांधकामे सुरू असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आणला. त्यानंतर मावळातील जैवविविधतेला धोका पोहचून पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे, कृषिमित्र बबन कालेकर व सचिन मोहिते यांनी अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत पर्यावरण हित याचिका हरित लवादाकडे २ जुलैला दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, हरित लवादाच्या सुनावणीवेळी राज्य शासन, पर्यावरण व वन विभाग, पीएमआरडीए, महाराष्ट्र राज्य जैवविविधता विभागाला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या पुढील सुनावणीवेळी पीएमआरडीएने नोटीस बजावलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.मावळातील पर्यावरणाला हानीकारक बांधकामावर कारवाई करण्यात यावी. पवना धरण संपादित क्षेत्रामध्ये जे बाहेरून आलेले धनदांडगे यांनी केलेली अनधिकृत बांधकामे त्वरित काढून मूळ मालक असलेल्या शेतकºयांच्या पुनर्वसनासाठी जागा मिळावी. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काही सवलती देऊन मदत करावी.- बबन कालेकर, प्रकल्पग्रस्त शेतकरीपवना धरण परिसरात डोंगर पोखरून जी बांधकामे होत आहेत. त्यामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्यजीव पशुपक्षी स्थलांतर झाल्याचे दिसत आहेत. बराच ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मनमानी कारभार करून इतरत्र वळविण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये स्थानिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.- सचिन मोहिते, सामाजिक कार्यकर्तेनोटिसा बजावलेली नावे पुढीलप्रमाणे : सुरेंद्र नार्वेकर (पाले -पमा), होमी जेसिया (गेव्हंडे), विजय पंजाबी (तिकोना), नंदू पाठक (ब्राह्मणोली),देसाई (महागाव), लिनेश पटेल (पाले पमा), रवी खेमकर (तिकोना), मेहता (महागाव), सुमित चावला व मनोज सैनानी (महागाव), अशिस सिंग चावला (महागाव), राधिका अक्षय शहा (तिकोना), यशवंत शिलनिया (महागाव), डी. बी. माउडवाला (तिकोना), डॉ. सोनावाला (तिकोना), शिवाजी काळे (ब्राह्मणोली), कल्पराज धरमसिंग (गेव्हंडे खडक), रसतिक हरिया (गेव्हंडे), कालीमती डिसीव्हा (ठाकूरसाई), आद्रेशिर नारियावाला (तिकोना), गोपाल अमिन (ठाकूरसाई), फिरोज इराणी (शिंदगाव), टिना मॅडम (आंबेगाव), सेनेपी लोबो (तिकोना), इनसिया इज्जुदिन (तिकोना), पुनित शेट्टी (महागाव), कटारिया (वारू), श्रेयस संखे (गेव्हंडे खडक), कुमेंद्र चक्रवर्ती (गेव्हंडे खडक),जे. रजनीकांत श्रॉफ (काले), प्रदीप थामपी (पवनानगर) दीप त्रिवेदी (पाले), देवदत्त गंगावन (तिकोना), किशोर चौधरी (दुधिवरे), जितेंद्र सरतडेल (दुधिवरे), जोसिफा डिसोजा (ठाकूरसाई), मोतिलाल बिजलानी (तिकोना), शेखर दाडरकर (खडक), एन.एल.नरुला (तिकोना) एम. एस. गिलोत्रा (शेवती), विवेक सुथारिया (शेवती), समीर सरिया (तिकोना), अतुल दयाळ (पाले), नहिद नमुहल हसन भज्जी (शिंदगाव), चंद्रकांत चोक्सी (आंबेगाव), इमरान आतरवाला (आंबेगाव), हरेश बलानी (आंबेगाव), विशाल डडलानी (तिकोना), समी लाला (तिकोना), राहुलभाई ढुलकिया (पाले), सुनील चोक्सी (तिकोना), लहसित संघवी (ठाकूरसाई), समीर शहा (आंबेगाव), सुमित चक्रवर्ती (तिकोना), खुर्शिद दारुवाला (तिकोना), जोजर खुराकिवाला (ठाकूरसाई) यांना नोटिसा बजावल्या आहेत.
पवनेतील अनधिकृत ६४ बांधकामांना नोटिसा, ‘पीएमआरडीए’ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:56 AM