शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

आता चुकीला माफी नाही! पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार : डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 10:08 PM

सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.

ठळक मुद्दे आमची विरोधाची धार वाढणार आहे..

पिंपरी: विरोधकांच्या प्रभागातील कामे अडविण्याचे धोरण सत्ताधारी भाजपाने स्वीकारले आहेत. यापुढे अडविणाऱ्यांची जिरवणार असून कोरोना कालावधीत केलेल्या खरेदीवर आक्षेप आहेत. मयतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. संकटकाळात तुंबड्या भरण्याचे काम कोणी केली असेल. तर, त्यांना माफी नाही. आता भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे, असा गर्भित इशारा सत्ताधारी भाजपालाराष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दिला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारी काळभोर नगर येथे झाली. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, श्याम लांडे, विक्रांत लांडे, जगदीश शेट्टी, निहाल पानसरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, संगीता ताम्हणे, वर्षा जगताप, फजल शेख आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, पालिकेच्या निविदा रात्री-अपरात्री मंजूर केल्या जात आहेत. त्याचे नेमके गौडबंगाल काय आहे. नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. स्मार्ट सिटीत शहराची घसरण झाली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाईप पडून आहेत. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.' ............ शहरवासियांच्या प्रश्नासाठी महापालिकेतील सभागृहाबाहेर आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही, पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत सत्ताधाऱ्यांनी आडवा आणि जिरवाची भूमिका घेतल्यास अडविणाऱ्याची जिरविनार आहोत, असेही डॉ कोल्हे म्हणाले. ........ डॉ कोल्हे म्हणाले, '' रॅपिड टेस्टचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस आणि आरटीपीसीआरचे रिपोर्ट येण्यास दहा दिवस लागत आहेत. हा अतिशय अक्षम्यपणा आहे. रिपोर्ट येईपर्यंत रुग्ण वाहक राहू शकतात. त्यामुळेच शहरातील रुग्णवाढ झालेली दिसून येते. हे प्रशासनाचे अपयश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस