केंद्राने परवानगी दिल्यास हिंदूस्थान अँटीबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मदत करणार आहे अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावेळी उद्योगनगरीमध्ये असलेल्या एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली तर तुटवडा कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, महापौर उषा ढोरे, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली होती.
आर्थिक मदत देण्यास तयार आहोत. मात्र, त्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. येथे तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालणार आहोत. येथील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यावरच कंपनीने दुसऱ्यांना लस द्यावी.पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही एचएला मदतीस महापालिका तयार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाची अपेक्षा
हिंदूस्थान अँटिबायोटिकने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली आहे. हा प्रश्न आपण केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत नेला आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, एचए कंपनीस लस निर्मिती करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे.''
महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ''याबाबत प्रस्ताव आला आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास, यातून महापालिकेस लस मिळणार असल्यास मदत केली जाईल.''