शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 2:04 AM

मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

दिघी- परिसरातील मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी दिघीकरांनी तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून हतबल झालेल्या नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयासमिळत आहे. असे केल्याने मोकाट कुत्री फिरकत नसल्याचा ‘जावईशोधा’ला मात्र कुठलाही वैज्ञानिक आधार नसून उलट या रसायन मिश्रित कुंकवाचे पाणी शरीरासाठी अपायकारक असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे. तर पशुवैद्यकीय अधिकारी यांनीसुद्धा हा दावा खोटा असून, गैरसमजातून नागरिक या प्रकारास बळी पडत असल्याचे स्पष्ट केले आहे.दिघी परिसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून नागरिक आपल्या घरासमोर कुंकवाचे लाल पाणी प्लॅस्टिक बाटलीमध्ये ठेवत आहेत. हळूहळू याची चर्चा होत हा प्रकार दिघी परिसरात वाढत गेला. आदर्शनगर, शिवनगरी व अन्य भागात याचे लोण पसरून सगळीकडे रस्त्याच्या कडेला लाल रंगाच्या बाटल्या दिसू लागल्या. याविषयी नागरिकांना विचारणा केलीअसता शेजाऱ्यांनी ठेवली म्हणून आम्हीसुद्धा ठेवली असल्याचे सांगितले. तर महिला वर्गांनी यामुळे खूप फरक जाणवत असून, मोकाट कुत्री परिसरात फिरकतसुद्धा नसल्याचे सांगितले.मात्र याला आधार काय असे विचारले असता लाल रंगाला कुत्री घाबरत असल्याचे सांगितले. लाल रंगाने कुत्री येत नसल्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न प्रत्येक नागरिकांना विचारला तेव्हा कुणी यू ट्युब वर बघितले, टीव्हीवर दाखविले, आमच्या गावाकडे पण करतात, अशी ढोबळ उत्तरे मिळाली.अंधश्रद्धा : शैक्षणिक संस्थेच्या आवारात शिरकावदिघी परिसरात चर्चेचा विषय ठरू पहाणाºया या प्रकारामुळे अशिक्षित किंवा कमी शिकलेले नागरिक अनुकरण करतात़ हे ऐकवेळ मान्य होईल मात्र शैक्षणिक संस्थांमधून ज्ञानदानाचे कार्य करीत विज्ञानाचा पुरस्कार करणारे या विळख्यात सापडले असल्याचे वास्तव आहे. परिसरातील उच्च शिक्षित तसेच शैक्षणिक संस्था यांच्या आवारात लाल रंगाच्या बाटलीचा प्रयोग केल्याचे दिसून येते. यावरून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धेच्या खाईत ढकलण्याचा हा प्रताप म्हटला तर वावगे ठरू नये.वैज्ञानिक आधार नसून फक्त मानसिक समाधानदिघीत झालेला हा प्रकार या आधी महाराष्ट्रातील अनेक भागांत झाला आहे. तेव्हासुद्धा प्राणी मित्रांनी याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून खोटा समज पसरविला आहे. सर्व कुत्रे याला घाबरतात असे नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर एका ठिकाणी कधी नसतो. दोन चार दिवस घाण झाली नाही म्हणून फरक पडला असे अजिबात नसून, मानसिक समाधान आहे. काही ठिकाणी तर लाल रंगाच्या बाटलीच्या जवळ कुत्र्यांनी घाण केल्याचे आढळून आले आहे.- विक्रम भोसले, प्राणी मित्रकुठलेही तथ्य नसून नागरिकांनी विश्वास ठेवू नयेलाल रंगाला घाबरून मोकाट कुत्री येत नसल्याच्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही़ गैरसमज व प्राण्याविषयी असलेली अपूर्ण माहिती यामुळे नागरिक या प्रकारास बळी पडत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारावर विश्वास ठेवू नये. उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्ताची योग्य ती कारवाई प्रशासनाकडून केली जाते.- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरीकुत्र्यांचा उपद्रवदिघी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. उपद्रवी ठरणाºया कुत्र्यांची संख्या जास्त आहे. प्रशासनाला तक्रार करूनही निवारण होत नाही. नावापुरती कारवाई करून नंतर लक्ष दिले जात नाही. रात्री बेरात्री परिसरात कुत्र्यांचा हैदोस असतो. ठिकठिकाणी घाण केलेली, गाडीची सीट कुरतडणे, चपला पळवणे, लहान मुलांच्या व वाहनचालकांच्या मागे लागणे, अशा घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी.- विनायक प्रभू,स्थानिक नागरिक, आदर्शनगर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJara hatkeजरा हटके