शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आॅनलाइन कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:53 AM

माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने आॅनलाइन कर भरण्यास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक प्राधान्य देत आहेत.

पिंपरी : माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने आॅनलाइन कर भरण्यास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक प्राधान्य देत आहेत. आजपर्यंत ३९१ कोटींचा करभरणा झाला असून, त्यापैकी १३८ कोटी रुपयांचा कर नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने भरला आहे. एक लाख वीस हजार म्हणजे ३५ टक्के नागरिकांनी आॅनलाइन करभरण्यास प्राधान्य दिले आहे. गत वर्षाच्या तुलनेत आॅनलाइन भरण्यात दुप्पट वाढ झाली आहे.पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २२ लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरनिर्माण अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाण पूल शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयीसुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे शहराचा लौकिक वाढला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलांची निर्मिती होत आहे. मालमत्ताकर भरणा वाढला आहे.दरम्यान, महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी आणि मिळकत कराचा भरणा आॅनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा सात वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याविषयी जनजागृती केल्याने आॅनलाइनला प्राधान्य मिळूलागले आहे. यात वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याने प्राधान्य दिले जात असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.महापालिकेत आजअखेरपर्यंत ३९१.११ कोटींचा मिळकत कर भरणा झाला आहे. त्यापैकी १३८.२१ कोटीचा भरणा आॅनलाइन पद्धतीने झाला आहे. महापालिका परिसरातील नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरातील विविध भागांत पंधरा करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. भरणा वाढला आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.>थकबाकीदार नागरिकांना नोटीसपिंपरी : शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकतकर भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले. महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजल्याने अनधिकृत बांधकामांना शास्ती लावली होती.अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण मंजूर केले असले तरी जाचक अटीमुळे फक्त नऊ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान मार्च अखेरमुळे मिळकतकर विभागाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पूर्वीच्या नोटिसा बजाविल्यानंतरही सात दिवसांचे आत मिळकतकराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर मिळकत जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी २०१८अखेर ज्या मिळकतधारकांकडे रक्कम रुपये पाच हजारांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकतकर भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. जे मिळकतधारक नोटीस बजावूनही थकबाकी भरणार नाहीत, अशा मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाईकरण्यात येत आहे.दोन लाख ७८ हजार मिळकतधारकांनी ३८० कोटी ४३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख १८ मिळकतधारकांनी आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे.