शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

उमेदवारीसाठी ‘ओबीसी’ आक्रमक

By admin | Published: January 23, 2017 2:56 AM

आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत वडगाव गणात सर्व राजकीय पक्षांत ओबीसी समाजाचे प्रबळ उमेदवार असतानाही खऱ्या

वडगाव मावळ : आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत वडगाव गणात सर्व राजकीय पक्षांत ओबीसी समाजाचे प्रबळ उमेदवार असतानाही खऱ्या ओबीसींना डावलून अलीकडे दाखल मिळविलेल्या कुणबींना उमेदवारी देण्याच्या तयारीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष असल्याने ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेत ओबीसी समाजातील उमेदवारांना तिकीट दिले नाही, तर आगामी निवडणुकीत सर्वच पक्षांना ओबीसीच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच दिला आहे.रविवारी येथे वडगाव गणातील ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कार्यकर्त्यानी सर्वच पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत ओबीसी कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली. रविकांत रसाळ, दत्तात्रय माळी, विवेक गुरव, भरत कोकरे, सुदेश गिरमे, अंकुश देशमुख, अरुण वाघमारे, अनिता गुरव, सोमनाथ धोगडे आदींनी मार्गदर्शन केले. मधुकर वाघवले, मुकुंद भालेकर, बाळासाहेब भालेकर, विलास भोकरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, दिलीप आंनदे, रमेश सुतार, नंदकुमार गाडे, बाळासाहेब बोरावके, समीर दौंडे, स्वप्निल भुजबळ, विनायक लोकरे, रोहीत गिरमे, चेतन घाग, संजय वाघवले, सागर वारुळे, संजय लोणकर, बाळासाहेब दळवी आदी उपस्थित होते.वडगाव गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राखीव असून, सभापतिपद ओबीसीसाठी राखीव असल्याने सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सर्वच पक्षात या गणातून कुणबी उमेदवारीसाठी इच्छुक झाल्याने सर्वच पक्षातील ओबीसी इच्छुक उमेदवारानी नाराजी व्यक्त करुन पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले नाहीत. परंतु सर्वच पक्षात ओबीसीत प्रबळ उमेदवार नाहीत असा प्रचार होत असल्याने या बैठकीत सर्वच पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या गोष्टीचा विचार सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला नाही, तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)