शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

जन्म-मृत्यू ऑनलाइन सुविधेच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:53 AM

ऑनलाइन सुविधा देता यावी, याकरिता ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदेबद्दल जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी आक्षेप नोंदविला आहे.

पिंपरी : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचे कामकाज संगणकीकृत व्हावे, त्याचबरोबर ऑनलाइन सुविधा देता यावी, याकरिता ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदेबद्दल जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नोंदणी प्रक्रियेसाठी आॅनलाइन संगणकप्रणाली वापराकरिता शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन होणे अपेक्षित होते. पिंपरीतील शुभम उद्योग या कंत्राटदाराने या अटी, नियमांचे पालन केले आहे का, याबद्दल जाणीव फाउंडेशनतर्फे महापालिकेला लेखी निवेदन देऊन खुलासा मागविला होता. मात्र महापालिकेने तो केला नाही.महापालिकेच्या करारनाम्यातील काही अटी, शर्तींचा भंग करून मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. शुभम उद्योग या कंत्राटदाराशी ८६ लाखांचा करारनामा करण्यात आला. त्यास कापसे यांनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेने दखल न घेतल्याने आपण न्यायालयात धाव घेतली, असे कापसे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रशासनाला न्यायालयात बाजू मांडावी लागणार आहे.