पिंपरी : पती, पत्नीमधील संबंधाचे मोबाइलवर आक्षेपार्ह चित्रीकरण करून महिलेला ते दाखवून ब्लॅकमेलिंग करण्याबाबत धमकावणाºया आरोपीविरुद्ध महिलेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी कुंदन अष्टे या अरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून, हिंजवडी पोलीस त्याच्या मागावर आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुंदन अष्टे हा फिर्यादी महिला राहत असलेल्या इमारतीतच वास्तव्यास आहे. गेल्या तीन महिन्यांपासून फिर्यादी महिला आणि तिचे पती यांच्यातील संबंधाचे आक्षेपार्ह चित्रीकरण लपून छपून करीत होता. सेल्फी स्टिकच्या साह्याने त्याने चित्रीकरण केले. एवढेच नव्हे तर हे चित्रीकरण त्याने स्वत:च्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केले. त्याने ते चित्रीकरण संबंधित महिलेला दाखविले, तुझे आक्षेपार्ह चित्रीकरण आपल्याकडे आहे, असे सांगून तिला भीती दाखवली. संबंधित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी अष्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.दरम्यान शहर परिसरामध्ये अनेक प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आॅनलाईन लुटमारीचे प्रकारही वाढले आहेत. यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलिसांनीही बंदोबस्त करण्याची गरज आहे.
आक्षेपार्ह चित्रीकरण; आरोपीवर गुन्हा दाखल, ब्लॅकमेलिंगचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:06 AM