पिंपरी : नगरसेवकांना चोपून काढा, या एका अधिकाºयाच्या भाषणाचे पडसाद महापालिका सभेत उमटले. जनतेतून आम्ही निवडून आलो असून, पालिकेचे विश्वस्त आहोत. तर, अधिकारी नोकरदार आहेत. नोकरदार विश्वस्तांना चोपून काढण्याची भाषा कसा करू शकतो. अनेक वर्षे एकाच जागेवर बसल्याने अधिकाºयांना मस्ती आली आहे. नगरसेवकांना चोपून काढा म्हणणाºया अधिकाºयाला माफी मागायला लावावी, निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
महापालिकेचे उपअभियंता अनिल राऊत यांच्या समर्थनार्थ कर्मचारी महासंघाने केलेल्या आंदोलनात लघुलेखक रावसाहेब राठोड यांनी नगरसेवकांना चोपून काढा, अशी भाषा वापरली होती. त्यांच्या या व्यक्तव्याचे पडसाद उमटले. भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘जनतेतून आम्ही निवडून आलो असून, पालिकेचे विश्वस्त आहोत, तर अधिकारी नोकरदार आहेत. नोकरदार विश्वस्तांना चोपून काढण्याची भाषा कसा करू शकतो. आजपर्यंत एकाही अधिकाºयाचे असे बोलण्याचे धाडस झाले नाही. आता कसे धाडस होत आहे.’’नितीन काळजे म्हणाले, ‘‘चोपून काढण्याची भाषा लोकशाहीला, नियमाला धरून नाही.’’ सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडताना जबाबदारीने वागले पाहिजे. घटना खरी की खोटी चौकशीनंतर बाहेर येईल. आयुक्तांनी त्याची चौकशी करावी. अधिकाºयांनी जबाबदारीचे भान ठेवावे.’’सचिन चिखले म्हणाले, ‘‘या प्रकरणाची शहानिशा होणे आवश्यक आहे.’’ या वेळी संदीप वाघेरे यांनीही मत व्यक्त केले.४विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘मारहाण केल्याचा कोणताही पुरावा नसताना गुन्हा दाखल केला जातो. घटनाक्रम बघता तिसºया दिवशी कर्मचाºयाकडून तक्रार दिली जाते. आम्ही आमच्या घरची कामे सांगत नाहीत. आमच्यावर कामासाठी निवडून दिलेल्या नागरिकांचा दबाव असतो. नागरिकांचीच कामे आम्ही अधिकाºयांना सांगत असतो. नगरसेवकांना चोपून काढा म्हणणे अतिशय संतापजनक आहे. कर्मचारी अशी भाषा करीत असतील, तर महापालिकेत दररोज सेफ्टी गार्ड घालूनच यावे लागेल.’’४महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘‘कर्मचाºयांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. मर्यादेत राहून काम करण्यात यावे. आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. आम्ही जनतेचीच कामे सांगत असतो. त्यामुळे पुन्हा कोणी अशी भाषा वापरता कामा नये. संबंधित कर्मचाºयाला योग्य ती समज द्यावी.’’४अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘अधिकाºयाने काम टाळले हे पाहणे महत्त्वाचे आहे. जाणीवपूर्वक अधिकाºयांनी काम टाळले नाही पाहिजे. योग्य काम केलेच पाहिजे. कामे अडविली जाता कामा नयेत. नगरसेवक चुकीच्या कामासाठी दबाव आणत असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करा. नगरसेवकांना चोपून काढण्याची भाषा चुकीची आहे.’’