लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण रविवारी करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर नितीन काळजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. ब्राह्मण महासंघाकडून अभिवादनअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, अहल्यादेवी होळकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काळेवाडीतील, श्रीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, संजीवनी पांडे, जितेंद्र कुलकर्णी, गणेश हुंबे, पुष्कराज गोवर्धन, राजन बुडुख, सुहास फोफळे, सुनील देशपांडे, महेश बारसावडे, मुकुंद कुलकर्णी, पीयुष अवटी, दिलीप गोसावी, उज्ज्वला केळकर, अविनाश नाईक, माधुरी ओक, संदीप बेलसरे, गोपाळ कळमकर, उपेंद्र पाठक उपस्थित होते. शहर प्रवक्ता अशोक पारखी यांचे भाषण झाले.स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर अस्पृश्यतेविरुद्ध लढले. आज मात्र राजकीय अस्पृश्यता वाढीस लागली आहे. ही राजकीय अस्पृश्यता बाजूला करण्याची गरज आहे. लढाई राजकीय असावी ती वैयक्तिक असू नये, हे काही जणांनी शिकण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रांत संचार केला. क्रांतिकारक म्हणून सोन्यासारखे व्यक्तिमत्त्व आपल्याला भेटले. हिंदू धर्मातील रूढी, परंपरांविरुद्ध ते लढले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही हिंदुत्ववादी होते. पण, त्यांचे हिंदुत्व हे धार्मिक भावनेने नाही तर राष्ट्रीयत्वाने भारलेले होते. आपले विचार समाजात रुजवताना बाळासाहेब यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत. पत्रकार, व्यंगचित्रकार म्हणून स्वकर्तृत्वावर उदयाला आलेल्या बाळासाहेबांचे जगभरात नाव घेतले जात आहे, असे बापट म्हणाले.
तैलचित्रांचे अनावरण
By admin | Published: May 29, 2017 2:41 AM