हिंजवडी (पुणे) : सायंकाळी सहाच्या सुमारास डांगेचौक येथील ग्रेड सेप्रेटरमध्ये अज्ञात वाहनातून पुन्हा ऑइल गळती झाली. यावेळी सुमारे वीसहून अधिक दुचाकीस्वार घसरून पडले. स्थानिक युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान मुळे मोठा अनर्थ टळला मात्र, वर्दळीच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या ऑइल गळतीमुळे वाहचालकांची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे. दरम्यान, गुरुवार (दि.२१) रोजी सायंकाळी ही घटना घडली.
आयटीपार्कच्या पिक आवरला डांगे चौक सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर ऑइल गळती झाल्याचे समजताच थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने योग्य वाहतूक नियमन करत पुढील अनर्थ टाळला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचताच रस्ता धुवून पूर्ववत करण्यात आला. यावेळी, वाकड वाहतूक विभागाचे अधिकाऱ्यांनी सुद्धा सतर्कता दाखवत वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेतली. प्रसंगावधान दाखवत स्थानिक युवकांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.
घटनास्थळी वाकड वाडतुक पोलिस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजन, थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभु तसेच, चेतन पंडीत, यश कुदळे, योगेश चितोडकर, रोहन गोडांबे, हिराशेठ प्रजापती यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आपले कर्तव्य पार पडले.