शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 9:30 PM

मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्य करत आहे.

ठळक मुद्दे पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतवृद्ध दाम्पत्य चिखलीतील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल

चिखली : रविवार सायंकाळपासून इंद्रायणी नदीच्या परिक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी चिखली येथे इंद्रायणी नदीच्या काठावर मोई गावच्या स्मशानभूमीतही पाणी शिरले. पुरापासून बचावासाठी या स्मशानभूमीत अडकलेल्या दाम्पत्याची अग्निशामक विभागाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून रामलखन शर्मा वय ७० वर्षे आणि मालनबाई शर्मा वय ६८ वर्षे हे वृद्ध दाम्पत्य संसारोपयोगी जुजबी साहित्य, पाच कुत्रे आणि दोन मांजरी यांच्यासह वास्तव्य करत आहे. रविवारी रात्रीपासून नदीची पाणीपातळी हळूहळू वाढत गेली. पुराचे पाणी वाढले तसे झोपडीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पुराचा धोका लक्षात घेऊन त्यांनी जवळच्या स्मशानभूमीत आसरा घेतला. पहाटेच्या सुमारास स्मशानभूमीतही पाणी शिरले. आणखी पाणीपातळी वाढल्याने स्मशानभूमीतही दोन तीन फुटापर्यंत पाणी चढले. शर्मा दाम्पत्याने स्मशानभूमीच्या लोखंडी खांबाला धरून कसाबसा तग धरला. हा सर्व प्रकार मयूर उगळे यांच्या लक्षात आला. त्यांनी ताबडतोब पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पिंपरीतील संत तुकारामनगर मुख्य अग्निशामक केंद्र व तळवडे अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून दोन बोटी मागविण्यात आल्या आणि पुरात अडकलेल्या शर्मा कुटुंब तसेच कुत्र्यांची एकापाठोपाठ एक करत सुखरूप सुटका केली.    बचाव पथकातील अधिकारी ऋषिकेश चिपाडे, लिडिंग फायरमन अशोक इंगोले, वाहनचालक पद्माकर बोरावके, शहाजी कोपनर, नितिन कोकरे, महेंद्र पाठक, सुभाष घोडके, नाथा शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

गारठल्याने वृध्द दाम्पत्यावर उपचाररामलखन आणि मालनबाई शर्मा यांना बचाव करण्यासाठी प्रयत्न केलेल्या मयूर उगळे यांनी त्यांची पुरातून सुटका केली. पावसात भिजल्याने वृध्द दाम्पत्य गारठले होते. त्यामुळे ते थंडीने कुडकडत होते. या वृद्ध दाम्पत्याला चिखलीतील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून मोई येथील मंदिरात तात्पुरते राहण्याची व्यवस्था करत माणुसकीचे दर्शन घडविले. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडindrayaniइंद्रायणीfire brigade puneपुणे अग्निशामक दल