पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने करवसूलीबाबत कडक धोरण स्विकारल्याने उत्पन्नात भर पडत आहे. अवघ्या दोन महिन्यांत दीड लाख मिळकतधारकांनी २०४ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर पंचवीस टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यात निवासी मिळकतधारक अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख २ हजार २०३ मालमत्ता आहेत. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप अशा विविध बाबींमुळे दोन महिन्यांत दोनशे कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. त्यापैकी १ लाख ६२ हजार मालमत्तांनी २०४ कोटी ६६ हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
असा आला करऑनलाईन - 151कोटी 96 लाख 28 हविविध अॅप - 2 कोटी 42 लाख 87 हरोख - 25 कोटी 85 लाख 83 हधनादेशाद्वारे - 16 कोटी 23 लाखइडीसी- 2 कोटी 39 लाखआरटीजीएस - 3 कोटी 42 लाख
कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी१ लाख ६१ हजार ३५९ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल १ लाख ४६ हजार ९१ निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर ११ हजार ६७५ बिगर निवासी, २ हजार ७८९ मिश्र, १ हजार ४५ औद्योगिक तर ९७४ मोकळ्या जमीन असणाºया मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक २४ हजार ३९६6 जणांनी तर सर्वात कमी पिंपरी नगरमध्ये १ हजार ६२२ जणांनी कर भरला आहे.
कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधामालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि आॅनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यापूर्वी ज्या भागात मालमत्ता आहे त्याच भागातील कार्यालयात कर भरण्याची सुविधा होती. मात्र, विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी प्रथमच शहरातील कोणत्याही भागातील मालमत्ता धारकांना कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ चिंचवडची व्यक्ती तळवडे कर संकलन कार्यालयात कर भरू शकते.
निरंतर जप्ती कारवाई, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण ही त्रिसूत्री विभागाला आखून दिलेली आहे. त्यानुसार आमचा विभाग झोकून काम करत आहे. एक हजार कोटीशिवाय थांबायचे नाही असे ठरवले आहे. पुढील संपूर्ण वर्षाचे तारखेनिहाय सूक्ष्म नियोजन तयार केले असून, विभाग सातत्याने कार्यरत राहील.
- नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त