गहुंजे : सांगवडे ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदाराना नोटीस देऊन कर भरण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक हे करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरी जात असून, बुधवारी एकाच दिवशी एक लाख ५५ हजार ६६३ रुपयांची करवसुली झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतच्या वसुली पथकाने यंदा वसुली मोहिमेत सर्व थकबाकीदारांना सुरुवातीला नोटीस दिली असून थकबाकी भरण्याबाबत आवाहन केले आहे. त्यास काही प्रमाणात प्रतिसाद लाभला असून, आर्थिक वर्षाखेर जवळ येत असल्याने बुधवारपासून थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करण्यासाठी ग्रामसेविका स्वाती गोसावी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व ग्रामपंचायत सदस्य वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत. मोहिमेस पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. विविध करांची मागणी १२ लाख असताना ५० टक्के वसुली झाली असल्याचे, उर्वरित दिवसात मोठ्या प्रमाणात वसुली होण्याची आशा असल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)
दिवसात झाली दीड लाखाची वसुली
By admin | Published: March 24, 2017 4:10 AM