शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड, महापालिका प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:47 AM

पिंपरी शहराच्या ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा ठेकेदाराला दिलेला निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे.

पिंपरी : शहराच्या ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा ठेकेदाराला दिलेला निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे. आतापर्यंत ठेकेदाराने केवळ ३० टक्के काम पूर्ण केले आहे. ठेकेदाराला आतापर्यंत कामाचे ३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. करीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदाराला एक कोटीचा दंड ठोठाविण्यात आला असून, बिलाच्या रकमेतून ५० लाख वसूल केले आहेत. तर, उर्वरित ५० लाख वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयुआरएम) अंतर्गत महापालिका हद्दीत ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानुसार केंद्रीय सनियंत्रण समितीने १४३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता दिली. तर, या रकमेतून फक्त प्रकल्प उभारणी होणार असल्याने प्रकल्पाच्या पाच वर्षे देखभाल दुरुस्तीकरिता आणखी ७४ कोटी रुपये अधिक मोजण्याची तयारी महापालिकेने केली. या बहुचर्चित योजनेसाठी २१७ कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम प्रस्तावित करण्यात आली.चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली. दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यात निकोप स्पर्धा झाली नाही. तरीही सर्वांत कमी दराची २०७ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या कामासाठी १८ जून २०१६ ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.दिघी, भोसरी गावठाण, मोशी, जय गणेश साम्राज्य, स्पाईन रस्ता, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी, यमुनानगर, प्राधिकरण, चिंचवडमधील केशवनगर, प्रेमलोक पार्क, थेरगाव, दत्तनगर, सांगवीच्या काही भागात अद्यापही काम संथगतीने सुरू आहे. मुदत संपलीतरी ३० टक्केच काम पूर्ण झालेले आहे. कामात दिरंगाई केल्यामुळे ठेकेदाराला दंड करण्यात आला आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड