शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 5:21 PM

पिंपरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त 'सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी' हा उपक्रम राबविला.

पिंपरी : नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी हा उपक्रम राबविला. दृष्टीहीन असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त, एकल माता ज्योती माने एक दिवसाच्या अपर आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर पोलीस उपायुक्त बनला. या सुखद धक्क्यामुळे ते तिघेही भारावून गेले. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मंगळवारी दुपारी हा सोहळा झाला. पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. पोलीस दलातील बँड पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला.  कृष्ण प्रकाश यांनी रिना पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा एक दिवसाचा पदभार दिला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविला. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांचा देखील एक दिवसाचा पदभार विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर याच्याकडे देण्यात आला. तसेच या तिघांनाही पोलिसांचे कामकाज समजावून सांगण्यात आले.

एक दिवसाच्या पोलीस आयुक्त रीना पाटील म्हणाल्या, ‘‘पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. कुठलाही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात हे त्यांचं मोठेपण आहे. कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.’’ अपर पोलीस आयुक्त झालेल्या ज्योती माने म्हणाल्या, ‘‘पतीचे निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. तरुण मुलीचा सांभाळही करायचा होता. अशा परिस्थितीत फक्त पोलिसांनी जगण्याचं बळ वाढवलं. अन्याय झाल्यास महिलांनी पोलिसांची मदत घ्यावी.’’

पोलीस उपायुक्त (गुन्हे) झालेला दिव्यांशु तामचिकर म्हणाला, ‘‘मी अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास झालो. आता महाविद्यालयात जाईल. भविष्णात खूप मेहनत करून मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणूनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार. मला आमच्या समाजाची मानसिकता बदलायची आहे.’’  

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘कायदे आणि व्यवस्थेपेक्षा संविधान मानणाऱ्या नागरिकांमुळे कुठलाही देश चालतो, प्रगती करतो. आपल्या लोकशाहीचा गर्व वाटतो. नागरिकांनाही आमचे काम समजले पाहिजे आणि त्यांनीही आमच्या प्रति संवेदशीलता दाखवली पाहिजे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्तPoliceपोलिसRepublic Dayप्रजासत्ताक दिन