पिंपरी : भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कालिदास काळोखे (वय ६३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शंकर काळोखे (वय ६०, रा. प्राधिकरण) यांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. भेळ चौक, निगडी येथून जात असताना, विनायक काळोखे यांच्या ताब्यातील नॅनो मोटारीला रिक्षाचालकाने धडक दिली. या अपघातात नॅनो रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. अपघातात काळोखे यांचे बंधू कालिदास यांच्या छातीला जबर मार लागला. ते बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी न थांबता, पोलिसांना माहिती न देता रिक्षाचालक तेथून पळून गेला. काळोखे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची २० लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा४पिंपरी : चिखलीतील पंचवटी डेव्हलपर्सचे बनावट कागदपत्रे, शिक्के तयार करून खोट्या सह्या करून सेंट्रल बँक आॅफ इंडियातून २० लाख २० हजार रुपये कर्ज घेतले. या कर्जरकमेचा परस्पर अपहार केला. तसेच अन्य वित्त संस्थांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शंकरराव लोणकर, सचिन विठ्ठल लोणकर या दोन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधन अशोक वाघ (वय २८, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी आरोपीविरोधात चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. इमारतीतील सहा खातेदारांना फसवून अॅक्सिस बँक, मुंबई, एचडीएफसी, महाराष्टÑ बँक, पिंपरी फायनान्स या वित्त संस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.दिघीत चोरी४पिंपरी : आझादनगर येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री दूरचित्रवाणी संच, मोबाइल, हेडफोन असा एकूण एक लाख १७ हजारांचा माल चोरून नेला आहे. छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिघी पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितेश पोपट शिवले यांनी फिर्याद दिली आहे. चºहोलीतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे.मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार४पिंपरी : रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून दुचाकीस्वारास देहूरोड येथे धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हरीष यशवंत शेलार (वय ५३, रा. दापोडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली हरीश शेलार (वय २७) यांनी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत चालविले. त्यामुळे अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देताच मोटारचालक पळून गेला.