पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात व्हावे. ही मागणी एकदाची पूर्णत्वास आली. १५ आॅगस्टपासून पोलीस आयक्तालयाचे कामकाजही सुरू झाले. पोलीस यंत्रणा पुर्वीपेक्षा अधिक गतीने कार्यन्वीत झाल्याचे जाणवू लागले. रोज सकाळी पोलीस फौजफाटा महाविद्यालयांच्या आवारात टवाळखोरांवर कारवाई करण्यास जात आहे. ही कारवाई सलग तीन दिवसांपासून सुरू आहे. हे घडत असताना, थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी आरेरावी करण्याच्या घटनाही गेल्या तीन दिवसात सलग घडल्या आहेत. पोलीस महाविद्यालय आवारात आणि आरोपी पोलीस ठाण्यात असे चित्र नव्या पोलीस आयुक्तालयानंतर अधिक जाणवू लागले आहे.
दोन दिवसांपुर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात मद्यधुंद नशेतील तरूणींनी पोलिसांशी आरेरावी केली. या घटनेनंतर हिंजवडीत वाहतुक पोलीसाला वाहनचालकाकडून धक्काबुकी झाली. या दोन घटना ताज्या असताना,सांगवी पोलीस ठाण्यात रात्री १० च्या सुमारास फिर्यादीला पोलीस कर्मचाऱ्यांसमोर तेसुद्धा थेट पोलीस ठाण्यात मारहाण केली. फिर्यादीने दुकानातून सिगारेट घेतले, तो दुकानाजवळ थांबला असता, त्यास येथे सिगारेट पिऊ नको, असे सांगत आरोपीने शिवीगाळ केली,एवढेच नव्हे तर त्यास मारहाण केली. गस्तीवरील पोलिसांनी हा प्रकार पाहिला. फिर्यादी सांगवी पोलीस ठाण्यात येऊन घडल्या प्रकाराची फिर्याद देत असताना,तीन आरोपी तेथे आले. त्यांनी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्यासमक्षच फिर्यादीच्या थोबाडीत मारली. बहेर लावलेल्या फलेक्सचा लोखंडी पाईप घेऊन येऊन पोलीस ठाण्यात ते टेबलावर जारजोरात पाईप आपटू लागले. आरडा अाेरडा करून सरकारी कामात त्यांनी व्यत्यय आणला. या सलग घडलेल्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीतील नियोजनात काहीतरी चुकीचे होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांमध्ये दहशत; गुंड मोकाट पोलिसांनी टवाळखोरांविरूद्ध महाविद्यालय आवारात सुरू केलेली मोहिम स्तुत्य आहे. परंतू महाविद्यालय आवारात जे गणेवशात नाहीत. संशयितरित्या ज्यांचा वावर आहे. अशांना हटकले पाहिजे. रोजच महाविद्यालयात पोलीस दिसू लागल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दहशत बसू लागली आहे. महाविद्यालयाच्या तक्रार पेटीत मुलींनी काही छेडछाडीच्या तक्रारी दिल्या आहेत का? याची माहिती घेऊन पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. असे मत पालक व्यकत करू लागले आहेत. या उलट परिस्थिती पोलीस ठाण्यांमध्ये असल्याचे काही घटनांमधुन निदर्शनास आले आहे. पोलीस चौकीत जाऊन पोलिसांनाच धमकावले जात असेल तर येथील गुंडगिरीवर कसा वचक आणणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.