शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

पालिकेची अपंगांना दीड हजाराची पेन्शन, तीन टक्के कल्याण निधीचा विनियोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:04 AM

महापालिकेतर्फे अपंगांसाठी पेन्शन योजना राबविण्यात येणार असून, शहरातील १८ वर्षांपुढील अपंगांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार आहेत.

पिंपरी : महापालिकेतर्फे अपंगांसाठी पेन्शन योजना राबविण्यात येणार असून, शहरातील १८ वर्षांपुढील अपंगांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार आहेत.अपंगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ आता पेन्शन योजना अपंगांसाठी राखून ठेवलेल्या तीन टक्के अपंग कल्याण निधीच्या विनियोगाचा हिशेब व भविष्यातील खर्चाचे नियोजन येत्या सोमवार (दि. १३) पर्यंत अपंग कल्याण आयुक्तालयाला सादर करावे, अशा सूचना राज्यातील सर्व महापालिकांना देण्यात आल्या आहेत. खर्चाचे नियोजन महापालिकांनी स्वत:हून न केल्यास निधीच्या विनियोगासाठी भाग पाडण्यात येईल, असा इशारा अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिला. त्यानुसार सर्वच महापालिकांनी या निधीचा विनियोग करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेला त्याची दखल घ्यावी लागली आहे. २८ आॅक्टोबर २०१५च्या शासन निर्णयानुसार महापालिकांकडे अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेला तीन टक्के निधी हा त्याच महापालिका क्षेत्रातील नागरी भागातील अपंगांसाठी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपंगांसाठी पेन्शन योजना हा त्याचाच भाग आहे.पुणे, नागपूर आणि ठाणे या महापालिकांमध्ये अपंगांसाठी पेन्शन योजना राबविण्यात येतात का? याची माहिती घेऊन त्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार २५ जुलै २०१७ ला या तिन्ही महापालिकांकडून पत्राद्वारे, तसेच ई-मेलद्वारे माहिती प्राप्त झाली. त्याआधारे महापालिकेने अपंग पेन्शन योजनेचा मसुदा तयार केला आहे.महापालिका हद्दीतील रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, घरपट्टी पावती, वीज बिल, टेलिफोन बिल यापैकी एक पुरावा जोडणे बंधनकारक आहे. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाºया अपंगानांच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आगोदर कोणतीही शासकीय पेन्शन मिळत असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थींनी दरवर्षी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. योजनेच्या लाभासाठी हे निकष लावले जाणार आहेत. लवकरच ही योजना लागू केली जाणार आहे.