पिंपरी : हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिला. या कारणावरून तिला पिस्तुलातून गोळ्या घालण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगणक अभियंता तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र सोळंकी (रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ नोव्हेंबर २०१८ ला घडली. ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत फिर्यादी तरुणी व आरोपी जितेंद्र हे दोघे पूर्वी हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत काम करीत होते. त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी जितेंद्र याने तरुणीची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिला गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पाठलाग करीत तिच्या मोबाइलवर संपर्क साधला.आरोपी संगणक अभियंताआरोपीने अनेकदा तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रकाराला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सोळंकीवर गुन्हा दाखल केला आहे.