पिंपरी - राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली.पुढील काळात युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मीडिया वापरण्याबाबत जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विचार सोशल मीडियासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहोचवावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कमिटीच्या शनिवारी वतीने सोशल मीडियाबाबत जागृती करण्यासाठी खराळवाडीतील राष्ट्रवादी शहर कार्यालयात अहमदनगर येथील संगणक तज्ज्ञ योगेश फुंदे यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.या वेळी राष्ट्रवादी शहर महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, शहर प्रवक्ता फजल शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, प्रदेश युवक सरचिटणीस संदीप चिंचवडे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, युवक उपाध्यक्ष संतोष वाघेरे, आलोक गायकवाड, नीलेश निकाळजे, शेखर काटे, मंगेश बजबळकर, लाला चिंचवडे, अमोल पाटील, मयूर जाधव, अमित बच्छाव, संघटक सचिव कविता खराडे, पुष्पा शेळके उपस्थित होते. वाघेरे म्हणाले, की राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विरोधी पक्षांनी बिनबुडाचे आरोप सोशल मीडियातून केले. त्याला समर्पकपणे कार्यकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत.’’या वेळी शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांच्या हस्ते फुंदे यांचा सत्कार करण्यात आला.सोशल मीडिया : दबाव तंत्राचा वापरया वेळी योगेश फुंदे यांनी शिबिरात सहभागी सर्वांना ट्विटरचे अकाउंट ओपन करुन दिले व ते कसे वापरायचे याचे मार्गदर्शन दिले. सोशल मीडियाबाबत कोणालाही कोणावरही दबावतंत्र वापरता येत नाही. संविधानाने दिलेला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना पुरेपूर वापरता येतो. मात्र, विकृत विचारांचे लोक ट्रोलिंग करतात. तरीदेखील विचारांची लढाई विचारांनी लढायची याचे भान सर्वांनी ठेवावे, असेही फुंदे यांनी सांगितले.
विरोधकांनी थापा मारून फसविले - संजोग वाघेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:12 AM