पिंपरी : समाविष्ट गावांतील रस्त्यांच्या सुमारे सव्वाचारशे कोटींच्या कामात रिंग झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते योगश बहल यांनीही बुधवारी सत्ताधारी, ठेकेदार आणि प्रशासनाने रिंग केल्याचा आरोप केला आहे. रस्ते विकासाच्या ४२५ कोटींच्या कामामध्ये रिंग झाली आहे. करदात्यांच्या सुमारे ६३ कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. केवळ राष्ट्रवादी भ्रष्टाचारी असल्याचे खोटेनाटे सांगत भाजपाने भ्रष्टाचार सुरू केला आहे. या गैरकारभाराला पालिकेचे आयुक्तही जबाबदार असल्याचा आरोप बहल यांनी केला.गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या बैठकीत समाविष्ट गावांसह शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने मागील सभेत ४२५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. समाविष्ट गावांना न्याय दिल्याबद्दल सत्ताधारी पाठ थोपटून घेत असतानाच सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी रस्ते कामांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर विरोधी पक्षनेते बहल यांनीही पत्रकार परिषद घेऊन या कामात रिंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.‘तेरी भी चूप’चा कारभारबहल म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात कमी दराने निविदा भरल्या जात होत्या. आता भाजपाच्या राजवटीत मात्र दोन ते तीन टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. तथापि, अपेक्षित दर जास्त आहे. त्यामुळे रस्ते विकासातून तब्बल ६३ कोटी रुपयांवर पदाधिकारी व अधिकाºयांनी डल्ला मारला आहे. रस्ते विकासाच्या सर्व कामांमध्ये रिंग झाली आहे. रिंग करण्यासाठीच एकाच वेळी रस्ते विकासाची एवढी कामे आणली गेली होती. ठेकेदारांना खूश करण्याचे धोरण आखले जात आहे. ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ असे धोरण आहे.’’निविदेतील रिंगचे पुरावे दिल्यास कारवाई : श्रावण हर्डीकर१पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे सव्वाचारशे कोटींच्या कामांत रिंग झाले असून, त्यात आयुक्तांचाही सहभाग आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.त्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विकासात रिंग झाली, असे नुसते मोघम आरोप करणे चुकीचे आहे. विरोधकांकडे निविदेमध्ये रिंग झाल्याचे काही पुरावे असतील तर द्यावेत, निश्चित कारवाई केली जाईल, असेही हर्डीकर म्हणाले.२भाजपाविरोधात शिवसेना, राष्टÑवादीने जोरदार हल्लाबोल केला. आयुक्तांवरही रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘ रिंगला आळा बसावा, पारदर्शकता यावी यासाठी ई टेंडरिंग प्रक्रिया सुरू झाली. आता त्यातही रिंग होत असल्याचा आरोप होत आहे. आक्षेपाधीन विषयांवर नुसते मोघम आरोप करण्यापेक्षा सन्माननीय सदस्यांनी पुरावे द्यावेत. त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. ’’३शाहूनगरमधील सीमा भिंतीच्या विकासकामांच्या फेरनिविदेचीमागणी विरोधी पक्षनेते बहल यांनीहर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यावर हर्डीकर म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेल्या आक्षेपांची चौकशी केली जाईल. निविदा प्रक्रियेत काही त्रुटी आहेत काय, याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच आयपी मॅचिंगची तपासणी करण्यात येईल. दोषी असल्यास कारवाई करण्यात येईल.’’
विरोधी पक्षांचा आरोप : करदात्यांच्या ६३ कोटींवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:21 AM