पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या कारभारविरोधात आक्रमक भूमिका बजविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत नवीन विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जाणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक दत्ता साने, नाना काटे यांच्या नावांची चर्चा आहे.महापालिकेत १५ वर्षे सत्तेत राहणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. १२८ पैकी केवळ ३६ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. परंतु, वर्षभराच्या कालखंडात आवाज उठविण्यात विरोधी पक्ष कमी पडले आहेत, अशी तक्रारी शहर राष्टÑवादीतील बहलविरोधी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या होत्या. तसेच सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांशी सलगी केल्याचा आरोपही केला जात होता.दरम्यान, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनीही पद सोडण्याची तयारी दाखविली आहे. वर्षभरातील भाजपाच्या कारभाराविरोधात आवाज उठविला असून, पदाच्या भूमिकेला न्याय दिल्याचे त्यांचे म्हणने आहे.विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर मंगला कदम, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अजित गव्हाणे, दत्ता साने, नाना काटे यांच्या नावांची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणाºया अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे.या विषयी योगेश बहलम्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेतेपदी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण नेत्यांनी आखले आहे. माझा कालखंड पूर्ण झाल्याने नेत्यांनी सांगितल्यास राजीनामा देण्याची तयारी आहे.’’>पाच वर्षांत पाच जणांना संधीराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. विरोधी पक्षनेतेपदी काम करण्याची संधी अधिक लोकांना मिळावी या उद्देशाने पाच वर्षांत पाच विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे नियोजनानुसार विरोधी पक्षनेतेपद बदलले जाणार आहे. बहल यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यामुळे मार्चच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते योगेश बहल राजीनामा देणार आहेत. त्यानंतर नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.’’
विरोधी पक्षनेत्याची निवड २२ मार्चच्या सर्वसाधारण सभेत, कदम, गव्हाणे, साने, काटे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:26 AM