पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या विरोधात राष्टÑवादी काँग्रेसच्या शहरपातळीवरील नेत्यांनी मोहीम उघडली असून, यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायक यांनी तातडीची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्यामुळे लवकरच विरोधीपक्षनेते बदलले जाणार असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध प्रश्नांवर प्रखर विरोध होणे अपेक्षित होते. मात्र, समाविष्ट गावांतील ४२५ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सभागृहात राष्टÑवादी तोंडघशी पडली. स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी राष्टÑवादीच्या कालखंडातील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केले. माजी महापौर, स्थायी समिती सभापतींची नावे घेऊन त्यांच्या कालखंडातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. ‘विषय मंजूर होत असताना तुमचे सदस्य काय झोपले होते का?, असा प्रश्नही सावळे यांनी विचारला होता. महापालिका सभागृहातच सत्ताधाºयांनी विरोधकांचे दात घशात घातले. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया राष्टÑवादीने दिली नाही.भारतीय जनता पक्षातील भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका मांडली. मात्र, राष्टÑवादीकडून प्रखर विरोध झाला नाही. त्यामुळे राष्टÑवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते बदला, असा आग्रह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला आहे. विरोधी पक्षनेते कोणाला करावे, यासंदर्भात मते जाणून घेण्यासाठी पवार यांचे स्वीय सहायक शहरात आले होते. त्यांनी प्रमुख पदाधिकाºयांशी संवाद साधला. त्या वेळी ‘विरोधी पक्षनेते हे भाजपाला मॅनेज आहेत, त्यांना बदला नाहीतर पक्षाचे नुकसान होईल, असा आक्षेप घेतला. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांपेक्षा शिवसेनेचे माजी नगरसेवक मोठ्याप्रमाणावर चुकीच्या कामांना विरोध करतात. याबाबत तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाला संधी द्यावी, याबाबतही चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, राजू मिसाळ यांच्या नावांची चर्चा आहे.महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत राष्टÑवादी आक्रमकमहापालिकेतील गैरकारभाराबाबत राष्टÑवादी आक्रमक झाली आहे. कार्याध्यक्षपदी नियुक्त झालेले माजी स्थायी समितीचे सभापती प्रशांत शितोळे, माजी आमदार विलास लांडे आता सजग झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शितोळे यांनी भाजपाच्या कारभाराबाबत हल्लाबोल केले होते. आंदोलनही करण्यात येणार आहे.
विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचाली सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:38 AM