Pimpri Chinchwad: आमदार अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध; शहराध्यक्षांसह नगरसेवक, कार्यकर्तेही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:47 PM2024-10-22T15:47:25+5:302024-10-22T15:47:42+5:30

आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत, असा आरोप

Opposition to MLA Anna Bansode candidature City president along with corporators, workers are also upset | Pimpri Chinchwad: आमदार अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध; शहराध्यक्षांसह नगरसेवक, कार्यकर्तेही नाराज

Pimpri Chinchwad: आमदार अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध; शहराध्यक्षांसह नगरसेवक, कार्यकर्तेही नाराज

पिंपरी: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बहल यांनी मंगळवारी (दि.२२) पत्रकार परिषद घेत आमदार बनसोडे यांच्यावर तोफ डागली. बहल म्हणाले, पक्षाकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही अजित पवार चर्चा करत आहेत. कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, सर्वांशी चर्चा करण्याची माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यानंतरच पिंपरीचा निर्णय घेतला जाईल. दोन दिवसात उमेदवार ठरेल. याचा अर्थ अण्णा बनसोडे यांना उमेदवारी द्यायची नाही किंवा नवीन उमेदवार द्यायचा नाही असही नाही. कोणत्याही परिस्थितीत पिंपरीची जागा घालवली जाणार नाही. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. मूल्यमापन करून निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाईल. 

यांनी केली पिंपरीतून मागणी...

आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक काळूराम पवार, जितेंद्र ननावरे, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आरपीआएच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे राजेश पिल्ले, तेजस्विनी कदम आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पिंपरीतून उमेदवारींची मागणी केली असल्याचे शहराध्यक्ष बहल यांनी सांगितले.

नवीन चेहरा देण्याची मागणी....

बहल म्हणाले, आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत. नवीन चेहरा देण्याची लोकांची मागणी आहे. पिंपरीत राष्ट्रवादीचाच आमदार होईल. कोणीही नवीन आमदार आला तरी त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचेही चांगल्या माणसाला उमेदवारी द्यावी असे मत आहे. चेहरा बदली करायचा असेल तर जितेंद्र ननावरे यांना उमेदवारी द्या. मी झोकुन देऊन काम करणार असल्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिल्याचे देखील बहल यांनी सांगितले.

Web Title: Opposition to MLA Anna Bansode candidature City president along with corporators, workers are also upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.