पिंपरी - अयोध्येतील श्रीराम मंदिरासमवेत हिंदू राष्ट्र स्थापनेचाही अध्यादेश काढा, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात प्रांताचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले.चिखली येथील गजानन म्हेत्रे उद्यानाच्या मैदानावर झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाड्ये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी शंखनाद आणि त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. नीलेश सांगोलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमंत्र पठणानंतर सभेला प्रारंभ झाला.स्वाती खाड्ये म्हणाल्या, की ‘सनातन’ या नावाची भीती समाजात निर्माण व्हावी आणि समाज संस्थेपासून दूर व्हावा, अशी काँग्रेसची कूटनीती आहे. यासाठी अन्वेषण यंत्रणांनी नवनवीन मसालेदार कथा रचत सनातन संस्थेचा ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा जावईशोध लावला. आता स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणाऱ्यांचे सरकार सत्तेत असूनही तीच नीती सुरू आहे.पराग गोखले यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. चैतन्य तागडे यांनी सूत्रसंचालन केले.
श्रीराम मंदिरासह हिंदू राष्ट्र स्थापनेचा अध्यादेश काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:41 AM