नेहरुनगर : आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नाही. आमच्या रास्त मागण्यांसाठी आमचा लढा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांची वेतनश्रेणी कमी आहे. सरकार व प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी. अहोरात्र सेवा दिली जात असताना आमच्यावर असा अन्याय का? विश्रांतीगृह रिकामे करायला लावणे योग्य नाही. ऐन दिवाळीत रस्त्यावर येण्याची वेळ का आली याचाही विचार करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया वल्लभनगर एसटी आगारातील वाहक-चालकांनी ‘लोकमत’कडे नोंदविल्या.पिंपरी-चिंचवड आगारएसटी कामगारांचा संप पदनिहाय वेतन श्रेणीसाठी आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे. बाहेरील आगाराचे चालक/वाहक यांचे विश्रांतीगृह रिकामे करून त्यांची गैरसोय प्रशासनाने केली आहे. हे योग्य नाही. याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा व ते पूर्ववत देण्यात यावे.- प्रवीण मोहिते, अध्यक्ष,एसटी कामगार संघटनादीड लाख कर्मचा-यांची दिवाळी रस्त्यावर साजरी केल्याबद्दल सरकारचे आभार मानायला हवे. या संपाची पूर्वकल्पना आपल्याला असताना मुद्दाम प्रवाशांचे व एसटी कर्मचाºयांचे हाल केले . इतर कर्मचाºयांना व एसटी कर्मचाºयांना किती पगार आहे, याची कल्पना आपल्याला आहे. तरी आपण जाणूनबुजून कर्मचाºयांची पिळवणूक करीत आहात.याचा जाहीर निषेध करीत आहे.- मारकर दीपक, पिंपरी-चिंचवडसंप हा कर्मचाºयांचा अधिकार, हक्क आहे. प्रत्येकाला काळानुसार/ महागाईनुसार/ सरकारच्या धोरणानुसार पगारात गुजराण करणे अवघड असते. त्यामुळे पगारवाढ होणे गरजेचे आहे. आम्हाला सांगण्यात येते की, सरकारी कर्मचारी आणि तुमचे काम यात फरक आहे. परंतु, ज्यांना आपण सुज्ञ म्हणतो तो कोणीही सांगेल की कोणताही सरकारी कर्मचारी एसटीच्या पगारात काम करु शकणार नाही.- प्रदीप बळीराम घोलप, वाहकमहाराष्ट्र राज्य वगळून गुजरात, मध्यप्रदेश व इतर राज्यातील परिवहन सेवा राज्य सरकारमध्ये आहे. परंतु, आपले महाराष्ट्र राज्याच्या परिवहन सेवा राज्य सरकारमध्ये विलीन का नाही ? गलिच्छ कारभारामुळे व बेजबाबदारपणामुळे दीड लाख कर्मचारी घरापासून दूर केले.- निवृत्ती ढगोबा रोकडे, खजिनदारशासनाने अद्याप निर्णय न घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आज बाहेरील आगाराचे चालक-वाहकांची गैरसोय करून प्रशासनाने हा अन्याय केला आहे. याचा आम्ही आमच्या संघटनेकडून निषेध करतो.- हरिभाऊ जाधव, सचिव,महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाएसटीच्या संपात सरकार कुठे गेले आहे. हे कर्मचारी कुठल्या बाहेरील देशातील नव्हे तर महाराष्ट्रातीलच आहेत. त्या एसटी कर्मचाºयांना योग्य न्याय द्यावा.- सुर्वे बाळू रामचंद्र,चालकपरिवहन मंत्री व अध्यक्ष यांना माझी विनंती आहे की आम्ही एसटीमधील सर्व कर्मचारी हे महाराष्ट्रीय व मराठी आहोत. आपण जातीने लक्ष घालून एसटी कर्मचाºयांच्या संपाबाबत सन्मानाने तोडगा काढावा व कामगारांना न्याय द्यावा.- दिलीप भोसले, चालकमहामंडळाचे ब्रीदवाक्य आहे की, प्रवासी माझे दैवत व खासगी वाहतुकीने प्रवास करू नये. मग आता एसटीच्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये एसटी बसस्टँडमध्ये खासगी बस आणली. आता कुठे गेले ब्रीदवाक्य. जो अर्ध्या पोटी राहून आपले काम करतोय. ज्या सरकारला माणसाचा कळवळाच नाही.- मुळे विलासराव सुभाष,चालकसंप अगदी योग्य व रीतसर आहे. कर्मचाºयांवर अन्याय होत असल्यास त्यांना कोठे तरी वाचा फोडावी लागते. आणि तेच काम आम्ही केले आहे. आमच्या मागण्या प्रशासनाने व्यवस्थित पूर्ण कराव्यात, हीच विनंती. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली कर्मचाºयांचे विश्रांतीगृह रिकामे केले व त्यांना वाºयावर सोडले.- रवींद्र जगन्नाथ जगताप, येवला आगारहा संप हा कायदेशीर असून सर्व पूर्वकल्पना देऊन हा संप झालेला आहे. तरी एसटीने कर्मचाºयांचा विचार करावा.- रामदास मोहनराव साबळे, चालक
आमचा लढा केवळ रास्त मागण्यांसाठीच!, चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:47 AM