पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी तब्बल दहा दुचाकी तर एक रिक्षा चोरीचे असे एकूण अकरा गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात वाहन चोरीेचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक घटना मे महिन्यातील आहे. तर इतर मागील आठवड्याभरातील आहेत. निगडी, चाकण, भोसरी, आणि पिंपरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी एक दुचाकी थरमॅक्स कंपनीच्या गेट समोरून, तर दुसरी आंबेडकर वसाहत निगडी येथील घराच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा हे प्रकार घडले आहेत. त्यातील एका गुन्ह्यात चोरट्यांनी जेबीएम कंपनी समोरून दुचाकी चोरून नेली आहे. दुसरी घटना भामचंद्र विद्यालय भांबोली येथे घडली असून, विद्यालयासमोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून या दुचाकी चोरून नेल्या आहेत. चिखली पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरीचा तर एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही दोन्ही वाहने चोरट्यांनी घरासमोरुन चोरून नेली आहेत.
तळेगाव दाभाडे येथे जनरल हॉस्पिटल समोरून दुचाकी चोरून नेली आहे. तर सोमाटणे येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात देखील एक मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुचाकी घरासमोरून चोरून नेली आहे. फिर्यांंदीनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञान चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.