पिंपरी : सरकार कोणाचेही असो, अत्याचारित महिला, मुली भगिनी यांना न्याय मिळाला पाहिजे, गुन्हेगार यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असा महापालिका सर्वसाधारण सभेत हाथरस घटनेबद्दल आक्रोश व्यक्त करण्यात आला. शहर परिसरातील महिला सुरक्षितता यासाठी पोलिसासमवेत नगरसेवकांची बैठक घ्यावी, अशी मागणी केली.
महापालिका सभेत उत्तर प्रदेश येथे झालेल्या अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला. सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी घटनेचा निषेध केला. अत्याचारी वृत्तीचा निषेध केला. भाऊसाहेब भोईर आणि मंगला कदम यांनी अत्याचार घटनेचा निषेध केला. महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे म्हणाल्या, 'सरकार कुणाचेही असो महिलांवर अत्याचार होत असतील तर ही बाब चांगली नाही. महिलांवरील अत्याचार खपवून घेतली नाही. महापालिका गार्डन, उद्याने यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी केली.''
संगीता ताम्हाणे , आमच्या प्रभागात रस्ते खोदले आहेत, ते कशासाठी माहीत, महिलांची छेडछाड होत आहे, त्रिवेणीनगर परिसरात प्रकार घडत आहेत. सीसीटीव्ही केमॅरे बसविण्याची गरज आहे.
माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पोलीस आयुक्त यांच्यासमवेत एक बैठक घ्यावी, तसेच ज्या वार्डातील नगरसेवकाचे निधन झाले, तेथे निवडणूक न घेता त्यांच्याच कुटूंबातील व्यक्तीस संधी द्यावी, याबाबत सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा.'
मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचे निधन झाले, त्यांच्या वार्डात निवडणूक घेऊ नये.'
शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, शिक्षण मंडळातील ठेकेदारी मोडित काढून महिला मुलींच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, 'श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेवर सर्वांनी मते व्यक्त केली. उतरप्रदेश नाही तर सर्वच भागात अत्याचार होत आहेत. अत्याचार ही विकृती आहे. त्याला पायबंद बसायला हवा. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर परिसरात ४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा तातडीने सुरू करावेत. पोलिसबरोबर एक बैठक घ्यावी.'
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ' शहर परिसर मधील महिला सुरक्षा याबाबत पोलीस आयुक्त यांच्यासमवेत बैठक घ्यावी. शहरातील विविध भागात केमॅरे बसवावेत.''...........सीसीटीव्ही कॅमेेरे बसवा....भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, सुजाता पालांडे, मनसे गटनेते सचिन चिखले, आशा शेंडगे यांनी कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली.