शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

चिखलीत गाववाले विरुद्ध बाहेरचे

By admin | Published: February 18, 2017 3:24 AM

चिखली गावठाण, मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता साने, तसेच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेताजी काशीद

पिंपरी : चिखली गावठाण, मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता साने, तसेच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेताजी काशीद यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नरगसेविका स्वाती प्रमोद साने यांच्याशी भाजपाच्या स्वीनल म्हेत्रे यांची लढत लक्षवेधी होणार आहे. या प्रभागात विद्यमान आणि नवखे अशी लढत दिसून येत असून, विकासकामांचा मुद्दा निर्णायक ठरणार असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने, स्वाती साने यांच्या पॅनलमध्ये सोनम मोरे हे उमेदवार तसेच सतीश विठ्ठल दिघे हे पुरस्कृत उमेदवार आहेत. या परिसरात आरक्षणांचा विकास झाला नाही, याच मुद्द्याचे भांडवल विरोधक करत आहेत. परंतु चिखली परिसर महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेला भाग आहे. वाढत्या लोकसंख्येची पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन या भागात पाण्याची टाकी उभारली आहे. गोरगरिबांसाठी रुग्णालय असावे, यासाठी जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण केले आहे. टाऊनहॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय भूमिगत गटारे, रस्ते या मूलभूत सुविधांची पूर्तता झाली आहे, असा दावा विद्यमान नगरसेवक त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून करत आहेत. त्यांचा विकासाच्या मुद्द्यावर भर आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय साने, तसेच भाजपाचे पांडुरंग साने या दोन स्थानिकांविरुद्ध शिवसेनेचे नेताजी काशीद लढत देत आहेत. बहुजन समाज पार्टीचे विकास सूर्यवंशी याच ठिकाणी लढत देत आहेत. दत्ता साने यांच्या पॅनलमधील पुरस्कृत उमेदवार सतीश दिघे या उमेदवाराबरोबर भाजपाचे कुंदन गायकवाड, काँग्रेसचे अभिमन्यू गायकवाड, शिवसेनेचे नितीन रोकडे, आरपीआयचे विशाल साबळे रिंगणात आहेत. त्याचबरोबर अन्य सहा अपक्ष रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीच्या स्वाती साने यांच्याबरोबर भाजपाच्या स्वीनल म्हेत्रे, शिवसेनेच्या योगिता रणसुभे, अपक्ष संगीता कोरडे लढत देत आहेत. महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादीच्या सोनम मोरे यांच्याविरुद्ध भाजपाच्या अलका मोरे, शिवसेनेच्या लतिका सर्जेराव भोसले आणि अपक्ष साधना अंकुश मळेकर या लढत देत आहेत. (प्रतिनिधी)