पिंपरी : मुंबईकडून पुण्याकडे जाताना निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या अलीकडच्या वळणाच्या भागावर, गॅस टँकर पलटी होण्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या ठिकाणी अग्निशामक दलाचे आणि एलपीजी कंपनीचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. एका टँकर मधून दुसऱ्या तांकर्मधे गॅस काढण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातून पुणे मुंबई जुना राष्ट्रीय महामार्ग जातो.
महामार्ग वर दापोडी ते निगडी दरम्यानच्या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर तयार केलेला आहे, त्यामुळे या मार्गाने ट्रक, टँकर अशी जड वाहने ही जा करत असतात. या मार्गावर ग्रेड सेपरेटर तसेच उड्डाणपूल उभारलेले आहेत. तसेच. बाहेर दोन लेन, बिआरटी, आणि ग्रेड सेप्रेटर मध्ये दोन लेन आहेत. ग्रेड सेपरेटर मध्ये आत व ग्रेड सेपरेटर मधून बाहेर येण्यासाठी इन आऊट काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबईहून पुण्याकडे येताना पवळे उड्डाणपुलाच्या अलीकडेच पहाटे साडेतीन वाजता एक गॅस वाहतुक करणारा बीपीसीएल कंपनीचा टँकर पलटी झाला. त्यानंतर पंधरा मिनिटातच निगडीतील अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले. एकापाठोपाठ पाच अग्निशामक पाच अग्निशामक दलकाची दलाची पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी गॅस कंपनीचे कर्मचारी अधिकारी वर्गही दाखल झाले.
महापालिकेची अग्निशमन विभाग ४ टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी श्री चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल; महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, पोलीस उपायुक्त विवेक पाटील ,सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर पन्नास पोलीस इत्यादी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
गॅस स्थलांतरित करण्याचे काम सुरू
सुरुवातीला टँकर पलटी झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली त्यानंतर अधिकाऱ्यांच्या व अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत गॅस गळती होत आहे की नाही याबाबत तपासणी करण्यात आली सकाळी सव्वा आठ वाजल्यापासून टँकर मधले गॅस ट्रान्सफर करण्याचे काम सुरू झालेले आहे. सध्या गॅस ट्रान्सफर करणेसाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे. अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी विजयकुमार थोरात म्हणाले, ''कशामुळे झाला टँकर पलटी कशामुळे झाला. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सध्या अपघातग्रस्त टँकर मधून दुसऱ्या वाहनांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू झालेले आहे या भागातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.''