वडगाव मावळ : विविध सण, मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचा बंदोबस्त यासह विविध कामांसाठी २४ तास ड्युटी करून खाकी वर्दीचे कर्तव्य बजाविणाऱ्या मावळ तालुक्यातील सुमारे ५०० पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना कित्येक वर्षांपासून शासकीय घर नाही. पाण्यासहमूलभूत सुविधा अद्याप न मिळाल्याने वणवण फिरण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलीस ठाण्यांत सुमारे पाचशे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यांच्या कुटुंबीयांना अद्याप मूलभूत सुविधा न मिळाल्याने त्यांच्यावर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भाड्याच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव येथे कामाचा ताण खूप आहे. गेल्या तीस वर्षांपासून त्यांना राह्यला घर नाही. प्यायला शुद्ध पाणी नाही.ब्रिटिश काळातील आठ खोल्यांची जुनी चाळ आहे. ती मोडकळीस आली असून, दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत.कुठल्याही क्षणी ढासळू शकते. त्यामुळे कर्मचारी तेथे राहत नाहीत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत होते.आता ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडले गेले आहे. या पोलीस ठाण्याची इमारत जिल्ह्यात एक नंबरची आहे. या हद्दीत द्रुतगती महामार्ग, जुना व चाकण हायवे, तसेच उर्से औद्योगिक क्षेत्राचा परिसर आहे. कामाचा ताण खूप आहे. परंतू कर्मचाºयांना राहायला शासकीय घर नाही.तळेगाव एमआयडीसी हे पोलीस ठाणे दोन वर्षांपूर्वी नव्याने झाले. हे ठाणेही पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडले आहे. या पोलीस ठाण्याची नवीन इमारत झाली असली, तरी काही काम बाकी आहे. कर्मचाºयांना राहायला घर नसल्याने दूर अंतरावरून यावे लागते. या भागात नामांकित कंपन्या असल्याने कामाचा ताण खूप आहे. कामशेत पोलीस ठाणे हे वडगाव हद्दीत मोडत होते. या ठाण्याला स्वतंत्र दर्जा मिळून तीन वर्षे झाली. या हद्दीत धरणे, द्रुतगती महामार्ग व अन्य पर्यटनस्थळे आहेत. पोलीस ठाण्याची जागाही तोकडी असून, कर्मचाºयांना घर नाही.
लोणावळा : भिंतीला गेले तडेलोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाचे असलेले पवना धरण, किल्ले, एकवीरा देवीचे मंदिर असल्याने कामाचा मोठा ताण असतो.या ठिकाणी ब्रिटिशकालीन आठ खोल्यांची चाळ आहे. तीही मोडकळीस आली आहे. लोणावळा शहर हे राज्यात पर्यटन स्थळ म्हणून परिचित आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतो. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खंडाळा येथे ५२ क्वॉटर आहेत. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले असून, पावसाळ्यात घरात पाणी येते.४मावळ तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कर्मचाºयांना शासकीय घर मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव गेले आहेत. ते कित्येक वर्षांपासून टेबलावरच फिरत राहिल्याने २४ तास ड्युटी करूनही पोलिसांना घरांसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. याबाबत पोलीस कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.