पिंपळे गुरव : विठू माऊली तू..., कानडा राजा पंढरीचा..., विठ्ठल आवडी प्रेमभावे..., यासारख्या अभंगांनी पिंपळे गुरवकरांची दिवाळी पहाट भक्तिमय झाली. आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात आयोजित दीपावली संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर तथा माऊली मेश्राम, राधिका अत्रे व अक्षय निरगुडकर यांनी मराठी व हिंदी गाण्यांनी दिवाळी पहाट स्वरमय केली.
माऊलीने संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी यांच्या अभंगांसह पहाडी रागातून चाल बाई चाल... ही गवळन सादर केली. तर राधिकाने पैल तो गे काऊ कोकताहे..., आली माझ्या घरी ही दिवाळी... यासारख्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अक्षयने अग बाई अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेल्या मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते हे गाणे सादर केले. आई भवानी तुझ्या कृपेने... हे गोंधळ गीत व रेशमाच्या रेघांनी... या लावणीने तर स्वर मैफिलीत अधिकच रंग भरला. हिंदी गाण्यांमध्ये झुमका गीरा रे..., शिर्डी वाले साई बाबा... या कवालीने संपूर्ण नाट्यगृह साईमय झाले होते.मध्यांतरात आमदार लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार, ममता गायकवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, चंदाताई लोखंडे, उषा मुंढे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, दत्ताजी बारसवडे, डॉ़ प्रदीप ननावरे, डॉ़ दत्तात्रय कोकाटे, जवाहर ढोरे, मनीष कुलकर्णी यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.भिल्ल समाजवस्तीवर भाऊबीज साजरी४दिघी : दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या बीड जिल्ह्यातील पेंडगाव या गावात भिल्ल समाजाच्या वस्तीवर जाऊन त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. दिघीतील सामाजिक कार्यकर्ते, जीवनविद्या परिवर्तन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी पुढाकार घेऊन वंचितांच्या चेहºयावर हास्य फुलविले. ट्रस्टच्या माध्यमातून मुला-मुलींना नवीन कपडे, फटाके, फराळ देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.४आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित समाजातील मुलांनासुद्धा दिवाळीचा आनंद मिळावा याकरिता पहिल्या टप्प्यात दिघी परिसरातील पालावर जाऊन वंचितांच्या अंगणात नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली होती. भाऊबिजेचा मुहूर्त साधत या उपक्रमाचा दुसरा टप्पा बीड जिल्ह्यात जालना रोडवरील पेंडगाव शिवारात भिल्ल समाजाच्या वस्तीवर जाऊन करण्यात आला.४या वेळी समाजातील भाऊ-बहिणींची भाऊबीज साजरी करण्यासाठी फटाके, साड्या, शैक्षणिक साहित्य, किराणा व दिवाळी फराळ देण्यात आला. फटाके उडवण्याचा मुलांचा आनंद बघून पालकांनीसुद्धा नाच गाणे गात सहभाग घेतला. अशा प्रकारची दिवाळी आम्ही प्रथमच साजरी करीत आहोत. तुमच्यानिमित्ताने आम्हाला आज दिवाळीसणाची मजा लुटता आली असल्याची भावुक प्रतिक्रिया या वेळी मुलांनी दिली. या कार्यक्रमाला निवृत्ती जाधव, विक्रम गाडे, विशाल लाखुटे, महेश गाडे, कृष्णा कोळेकर, शंकर गाडे, गोपीनाथ इंगळे सहभागी झाले होते.आदिवासी भागात कपड्याचे वाटपवाकड :अविरत फाउंडेशन, थेरगाव सोशल फाउंडेशन व संस्कार प्रतिष्ठान यांच्या मार्फत आदिवासी भागात कपडेवाटप करण्यात आले. या वेळी अविरत फाउंडेशनवर प्रेम करणारे उद्योजक संभाजी बारणे, उद्योजक विजय फंड, सदस्य विक्रम शेळके, संतोष जाधव, प्रशांत ढेबे, तसेच थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभू,अनिल घोडेकर, श्रींकात धावारे, महेश येळवंडे, चंद्रशेखर गागर्ड उपस्थित होते़