वाकड : भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. तसेच सातत्याने पाकिस्तानकडून अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यांच्या गोळीबारात काश्मीरमधील ६० जवानांना वीरमरण आले आहे. या सर्वामागे जबाबदार असलेल्या पाकिस्तानचा अपना वतन संघटनेने वाकड येथे भव्य निषेध मोर्चा काढून तीव्र निषेध केला. शनिवार, दि. २२ रोजी सकाळी निषेध सभा झाली. या वेळी भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड, संघटनेचे संपर्कप्रमुख हरिश्चंद्र तोडकर, संघटक प्रकाश पाठारे, विजय साठे, शहराध्यक्ष उमेश लोहार, महिला उपाध्यक्ष निर्मला डांगे, सनी मकवाना, मलंग शेख, संतोष शिंदे, फारुख शेख, शिवसेनेचे युवराज दाखले, मिलिंदराजे भोसले, संजय गायके, मुजफर इनामदार, सिद्दिकी तारिक रिझवी, रेहान सय्यद, शबनम सय्यद, संपत पाडुळे, जमीर तांबोळी, स्वामी उमप, सलीम शेख, बाळू अडागळे, विजय चव्हाण, स्वामी उमप, सलीम शेख, राहुल पवार, शिवाजी धोत्रे, राजश्री शिरवळकर, अब्दुल कादिर, इर्शाद खान, कलिंदर शेख, संजय भालेराव, समीर उस्मानी, अश्रफ पठाण, आझम शेख, भागवत भूतके उपस्थित होते. (वार्ताहर)
‘अपना वतन’कडून पाकिस्तानचा निषेध
By admin | Published: April 24, 2017 4:47 AM