पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील चौक, उद्याने आदी महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे फलक लावल्याचे दिसून येत आहे. मात्र कार्यक्रमानंतरही महिने, दोन महिनेही ते फलक झळकत असून यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तरीही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सतत विविध कार्यक्रम होत असतात. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजक अनेक क्लृप्त्या लढविताना दिसतात. दरम्यान, प्रसिद्धी माध्यम म्हणून जाहिरातींचाही विचार केला जात असल्याचे दिसत आहे. यासाठी आकर्षक पध्दतीची मांडणी असलेले कार्यक्रमांचे जाहिरात फलक तयार केले जातात. या फलकांवर कार्यक्रमाची माहिती, त्याची रुपरेषा देण्यात आलेली असते. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचावी. मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे यासाठी शहरातील महत्त्वाची मध्यवर्ती ठिकाणे, चौक, उद्याने, बसथांबे, झाडे व भिंती आदी सार्वजनिक ठिकाणी फलक लावले जातात. एकीकडे शहर स्वच्छ करण्यासाठी प्रशासन अनेक योजना राबवित आहे. तर दुसरीकडे अतिरीक्त फलक हटविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. तरी त्वरीत हे फलक हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
अजूनही झळकत आहेत फलक
By admin | Published: January 30, 2017 2:51 AM