पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन भरलेले उमेदवारीअर्ज प्रत्यक्षात निवडणूक कार्यालयात सादर करपिंपरी : उमेदवारीअर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला होता. उमेदवारीसाठी अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केले. बंडखोराचा मोठा त्रास भारतीय जनता पक्ष आणि राष्टÑवादी काँग्रेसला सहन करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी संत तुकारामनगर-कासारवाडी प्रभागातून भाजपाकडून अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. पालांडे आणि जितेंद्र ननावरे यांची पत्नी प्रियंका या संत तुकारामनगर प्रभागातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक होत्या. मात्र, माजी महापौर योगेश बहल यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. राष्टÑवादीकडून डावलले जाणार असल्याचे समजल्यानंतर पालांडे व ननावरे यांनी गुरुवारी राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रियंका ननावरे यांना अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जागेवर आणि पालांडे यांनाही उमेदवारी दिली आहे.
उमेदवारांची पळवापळवी
राष्टÑवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरी होऊ नये, याची दक्षता राजकीय पक्षांनी घेतली आहे. प्रत्येकजण दुसरा पक्ष कधी उमेदवार जाहीर करतो. आणि त्या विरोधात आपला कसा उमेदवार देता येईल, अशी व्यूहरचना सर्वांनी आखली होती. उमेदवारांची पळवापळवी करण्याचे नियोजन नेत्यांनी केले होते. डावललेल्या सक्षम उमेदवारास पक्षातून संधी देण्यासाठीची व्यूहरचना केल्याचे दिसून आले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची पळवापळवी सुरू होती. ण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. उमेदवारीची उत्सुकता आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. शेवटच्या दिवशी अधिक अर्ज आल्याने निवडणुकीचे काम करणाºया अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची तारांबळ उडाली होती.