लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:00 AM2018-12-11T03:00:18+5:302018-12-11T03:01:04+5:30

पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

Parth Pawar's presence in Lonavla 'Marathon' | लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती

लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती

Next

लोणावळा : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोणावळा मॅरेथॉनला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावली. पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

पार्थ पवार लोणावळ्यात येणार असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे झेंडे, स्वागत कमानी व स्वागताचे बोर्ड लावत शहर राष्ट्रवादीमय करण्यात आले होते. पार्थ यांच्या हस्ते भाजी मार्केट चौकात मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, पालक असे हजारच्या जवळपास नागरिक सहभागी झाले होते. भाजी मार्केट चौक ते भांगरवाडी, पंडित नेहरू मार्ग, सिद्धार्थनगर, मावळा पुतळा चौक, जयचंद चौक मार्गे पुन्हा भाजी मार्केट चौक अशी ही मॅरेथॉन झाली.

राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, लोणावळा शहर महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितीन शहा, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, राजू बोराटी, रवी पोटफोडे, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड, राजेश मेहता, कुमार धायगुडे, अमोल गायकवाड, मनोज लऊळकर, दत्तात्रय गोसावी, संतोष कचरे, शीला बनकर, वकील सेलचे अध्यक्ष शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Parth Pawar's presence in Lonavla 'Marathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.