शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

मतदार जागृतीत सहभागी व्हा

By admin | Published: February 05, 2017 3:27 AM

महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या मतदार जनजागृती मोहिमेमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन

पिंपरी : महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या मतदार जनजागृती मोहिमेमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मतदार जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयुक्त वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.आयुक्त कार्यालयातील या बैठकीस सहआयुक्त दिलीप गावडे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सांगली जिल्हा मित्रमंडळाचे अध्यक्ष रणजीत औटे, गायत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिरामण भुजबळ, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दाणी, अक्षय बने, जलदिंडी प्रतिष्ठानचे राजीव भावसार, संस्कार प्रतिष्ठानाचे विनोद शेंडगे, अमित तलाठी, अमोल माने, शिरीष पांडव, भावसार व्हिजनचे संजन फुलारे, गणेश बसुतकर, गणेश जवळकर, रवींद्र मुळे, प्रशांत बारटक्के, डॉ. प्रवीण फुटाणे, अशोक गदाले, पवना जलदिंडीचे राजेंद्र सनगर, ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष रमेश सरदेसाई, घरकुल फेडरेशचे विश्वास कदम, पोलिस नागरिक मित्र संघाचे तुकाराम तनपुरे, राहुल श्रीवास्तव, विंग्ज आॅफ होपचे रवी लंगोले, पीसीसीएफचे तुषार शिंदे, लक्ष्मीकांत भावसार, इन्फोसिसचे लक्ष्मीकांत कातारे,ज्येष्ठ नागरिक संघाचे मोहन मालवडकर, प्रल्हाद आगळे, पोलीस नागरिक मित्र सूर्यकांत बरसावडे आदी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘मतदारांनी मतदानाची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडून जनहितासाठी सक्षम व योग्य उमेदवार निवडून द्यावा. चार उमेदवार निवडणून द्यायचे असल्याने प्रत्येक प्रभागात अ,ब,क,ड अशा चार जागांसाठी मतदान करावयाचे आहे. सर्व प्रभागांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानासाठी मतदारांना प्रवृत्त करावे. यापूर्वी झालेल्या कमी मतदानाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करून मतदारांना करणेबाबत जनजागृती करावी. निवडणूक या राष्ट्रीय प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी. (प्रतिनिधी)प्रलोभनांना बळी पडू नकाडॉ. माने म्हणाले, या निवडणुकीमध्ये प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील कोणतेही एक बटन दाबून एकूण चार मते नोंदवून मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटी करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे. कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला मतदारांनी बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. प्रत्येक प्रभागातील अ जागेच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा, ब जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, क जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा, तर ड जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असणार आहे. निवडणूक निर्भयमुक्त, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. उपस्थितांच्या शंकेचे समाधान आयुक्त वाघमारे व सहायक आयुक्त डॉ. माने यांनी केले. सह आयुक्त गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार राजीव भावसार यांनी मानले.