पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वतंत्र पासपोर्ट केंद्र खराळवाडी येथे २ एप्रिलला सुरू होणार आहे. राज्यातील वेगाने वाढणारे शहर म्हणून पाहिले जाते. देशभरातून मोठ्या संख्येने शिक्षण, नोकरी व इतर व्यवसायांसाठी नागरिक या शहरात वास्तव्यास आहेत. पासपोर्ट सेवा आॅनलाईन असली, तरीही कागदपत्रे व पडताळणीसाठी शहराबरोबरच चाकण, तळेगाव, हिंजवडी, लोणावळयातील नागरिकांना पुण्यामधील मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागते, हे कार्यालय शहरापासून १५ ते २० किमी दूर आहे. त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. यासाठी वेळ आणि पैसाही खर्च होत होता. त्यामुळे अशा प्रकारचे पासपोर्ट सेवा केंद्र शहरात सुरू व्हावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली होती. (प्रतिनिधी)
पासपोर्ट कार्यालय रविवारी होणार सुरू
By admin | Published: April 01, 2017 2:06 AM