पवनानगर : पवनाधरणाच्या परिसरात धरणग्रस्त शेतकरी आपली उपजीविका भागविण्यासाठी धरणाच्या परिसरातील मोकळ्या जागेवर कृषी पर्यटन व्यवसाय करत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या मार्फत बेकायदा बांधकामे पाडण्यात येत आहेत, न्याय मिळेपर्यंत व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे केली.परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. त्यावर परिसरातील धरणग्रस्त शेतकºयांनी आमदार बाळा भेगडे यांच्याशी चर्चा केली. आमची धरणग्रस्त शेतकºयांची जमीन मिळण्यासाठी याचिका न्यायप्रविष्ट असून, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्हाला धरणाच्या संपादित क्षेत्रातील मोकळ्या जागेत आमची उपजीविका भागविण्यासाठी साधन म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा व होणाºया अन्यायावर मात करून आम्हाला न्याय मिळेपर्यंत पर्यटन व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी धरणग्रस्त शेतकºयांनी या वेळी केली आहे.या वेळी आमदार भेगडे यांनी सांगितले की, पवना धरण परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांना धक्का लागू देणार नाही, असे अश्वासन बैठकीत दिले़ या वेळी भेगडे बोलत होते़ स्थानिकांनी सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती घेऊन यामध्ये येणाºया अडचणी सोडवून या तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या वेळी ठाकुरसाईचे सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, बबन कालेकर, रवी ठाकर, अनंता वर्वे, नवनाथ बोडके, प्रकाश ठाकर यांच्यासह ठाकुरसाई, गेव्हडे खडक, धरणग्रस्त तरुण उपस्थित होते़
पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 2:57 AM