वडगाव मावळ : कडक उन्हामुळे मावळमधील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे़. पवना धरणात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४० टक्के साठा होता़ यावर्षी ३३ टक्के साठा शिल्लक आहे. पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी, ही शेती उद्योगाला पाणीपुरवठा करणारी व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. पिपरी-चिंचवड शहरासाठी धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. १५ मार्चपासून ४७० दशलक्ष लिटर एवढेच पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण हे सर्वांत मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील पन्नास ते साठ ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.पवना धरणाचे शाखा अभियंता ए़ एम़ गदवाल म्हणाले, ‘‘सध्याच्या कडक उन्हामुळे दिवसेंदिवस पवना धरणात पाणीसाठा कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी व सध्या असलेला पाणीसाठा जुलैअखेर पुरविण्यासाठी धरणातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने ७ टक्के साठा कमी आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले, ‘‘नाणे मावळातील वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून आठवड्यातून दोन दिवस १२० ते १५० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. कुंडलिका नदीच्या माध्यमातून ते इंद्रायणीला सोडले जाते. सध्या धरणात ५२.६८ टक्के पाणीसाठा आहे, तर जाधववाडी धरणात ५४ टक्के पाणीसाठा आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली होती. ...........
आंद्रा धरणातून २२ संस्थांना पाणीपुरवठा४शाखा अभियंता ए. आर. हांडे म्हणाले,‘‘आंद्रा धरणातून तळेगाव नगर परिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो़ दोन तीन आठवड्यातून २०० ते ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. सध्या ६४.८० टक्के पाणीसाठा आहे़ जुलैअखेर पर्यंत पुरेल.’’