शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:09 PM

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून करण्यात आले नागरिकांना शांततेत बंद पाळावा, असे आवाहन सकाळी दहापासून ते सायंकाळी ५पर्यंत पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

पिंपरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पिंपरी-चिंचवड शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी शांततेत बंद पाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. चिंचवड स्टेशन, पिंपरी येथे दोन वाहनांवर जमावाने दगडफेक केली. एक पोलीस कर्मचारी  यामध्ये पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून त्यास तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पिंपरी चौक परिसरातील जमावाकडून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रकार घडला आहे. तर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये उभा असलेला टेम्पो फोडण्यात आला आहे. निगडीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून परत वळविण्यात आली आहे. दापोडी येथील चौकात वाहतूक खोळंबली. बंदोबस्ताच्या ठिकाणी महेंद्र गायकवाड हे पोलीस कर्मचारी चक्कर येऊन पडले. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी उपस्थित होते. जमावाची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भीमा कोरेगाव येथील घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमावातील काहीजण चौकातून निघून गेले. सकाळी दहापासून ते सायंकाळी ५पर्यंत पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद होता. भाटनगर, निगडी, पिंपरी या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड