- चंद्रकांत लोळेकामशेत - येथील मुख्य रस्त्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. डांबरीकरण झाल्यानंतर काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे. रस्त्याची एक बाजू बंद, तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक एका बाजूने सुरू असल्याने येथे वाहतूककोंडीची डोकेदुखी वाढली आहे. कोंडी सोडवणे वाहतूक पोलिसांनाही शक्य होत नसल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी वाहनचालकांना येथे दररोज कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने कामशेत शहरातील मुख्य रस्ता, वडगाव, लोणावळा शहरातील वलवण आदी तीन ठिकाणच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरूकेले. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. कामशेतमधील मुख्य रस्त्याचे काम जानेवारीत सुरूझाले. कामशेत पोलीस ठाणे ते खामशेत फाटा आणि छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते पवनानगर फाटा असे कामाचे स्वरूप होते. या कामात प्रथम मुख्य रस्त्यावर बीएम, कार्पेट व सीलकोट याप्रमाणे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मुख्य रस्त्याच्या ज्या भागात पाणी निचरा समस्या आणि त्यामुळे वारंवार रस्त्याची दुरवस्था होते त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते पवनानगर फाटा या पूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते गणपती चौक येथील काँक्रीटीकरण सुरू आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे.अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीची समस्याकामशेत शहर हे मध्यवर्ती असल्याने सुमारे ७० गावांमधील ग्रामस्थांचा येथे राबता असतो. खरेदी व तत्सम कारणांसाठी येणाऱ्या ग्रामस्थांसह दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक वाहने आदींची येथे मोठी गर्दी असते. गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणांमुळे येथे वाहतूककोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात रस्त्याचे काम सुरू असल्याने आणखी भर पडल्याने वाहनचालक व पादचारी यांची डोकेदुखी वाढली आहे.वाहतूक नियमनासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची गरजअवजड वाहन अथवा चारचाकी वाहन या मार्गावरून जात असताना समोरून दुचाकी अथवा पादचारीही रस्ता ओलांडू शकत नाही. एका बाजूकडील वाहने पूर्णमागे घेऊन वाहतूक खुली करण्यावाचून पर्याय राहत नाही. त्यात व्यापाºयांचे अवजड वाहन या रस्त्याने आलेच, तर ते मागे घेणेही जिकिरीचे होत आहे. परिणामी वाहनांची मोठी रांग लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करावा, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे आदी मागण्या नागरिक करीत आहेत.साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण असल्याने धोकारस्त्याचे डांबरीकरण झाले, मात्र साइडपट्ट्या अद्याप भरल्या गेल्या नाही. साइडपट्ट्या त्या आधी भरणे महत्त्वाचे असताना तसे न झाल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. मुख्य रस्त्याला साइडपट्ट्यांचा आधार नसल्याने या रस्त्याच्या खाली उतरणाºया व वर चढणाºया अवजड वाहनांनी रस्त्याच्या कडेच्या बाजूकडील कार्पेटची दुरवस्था झाली. अवजड वाहने जाऊन व कडक उन्हामुळे अनेक ठिकाणी कार्पेट खचले आहे. तसेच रस्त्यावर कडेला लागलेल्या अनेक दुचाकी पडल्याने नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे काँक्र ीटीकरण झालेल्या भागातही अद्याप साइडपट्ट्या भरल्या गेल्या नसल्याने रस्त्याची उंची वाढल्याने दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्याखाली उतरवता येत नाहीत.
कामशेतमध्ये सततच्या वाहतूककोंडीमुळे पादचारी, चालकांना करावी लागते कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 1:28 AM